मृत्यूची खोटी बातमी पूनम पांडेला भोवणार! कायदेशीर कारवाईची सत्यजीत तांबेची मागणी
Satyajit Tambe on Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाचं वृत्त अफवा असल्याचं समोर आलं आहे. लोकांमध्ये सर्वाइकल कॅन्सरची (Cervical cancer) जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने मोठं पाऊल उचललं आहे. अशातच आता महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पूनम पांडेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, तिने “खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली आहे आणि लोकांची फसवणूक केली म्हणून तिच्यावर कारवाई करावी. “सर्व्हायकल कॅन्सरने मॉडेलचा मृत्यू झाल्याची बातमी, या आजाराबद्दल जागरूकता करण्यासाठी हा मार्ग योग्य नव्हता. लोकांना र्वाइकल कॅन्सरबद्दल अनेक चांगल्या मार्गाने उत्तम प्रकारे समजावून सांगता आले असते. परंतु अभिनेत्रीने चुकीचे मार्ग निवडत चुकीची बातमी पसरवल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.
या प्रकारबद्दल अभिनेत्रीची खास मैत्रीण राखी सावंतने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे, “पूनम तू तर आम्हाला मोठा धक्काच दिला होतास. तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? माध्याम, चाहतावर्गासह माझ्याही भावनांचा तू खेळ केलास. आणि आता जिवंत असल्याचा व्हिडीओ बनवला आहेस. नक्की सुरू काय आहे तुझं? तुझ्या निधनाने मी दु:खी झाले होते”.
धक्कादायक! मृत्यूच्या बातम्यांदरम्यान Poonam Pandey स्वतः कॅमेऱ्यासमोर; मी जिवंत, हे सर्व केलं कारण…
पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल जाणून घ्या…: पूनम पांडेने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तसेच कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमानंतर ती जोरदार अॅक्टिव्ह झाली. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये ती स्पॉट झाली आहे. ‘हनीमून स्वीट रूम नंबर 911’ या सीरिजमध्ये ती शेवटची पाहायला मिळाली होती. छोट्या पडद्यावरील ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’, फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी या शोमध्ये देखील ती झळकली होती.