संगमनेरमध्ये ताबेंनी वचपा काढला! मैथिली सत्यजीत तांबेंकडून शिवसेनेच्या सुवर्णा खताळांचा पराभव

Maithili Satyajit Tambe यांनी संगमनेर नगरपरिषदेमध्ये अमोल खताळ यांच्या भावाच्या पत्नी असलेल्या सुवर्णा खताळ यांचा पराभव केला आहे.

Maithili Satyajit Tambe

Municiple Corporat Sangamner Shiv Sena’s Suvarna Khatals defeated by Maithili Satyajit Tambe : राज्यातील अनेक चुरशीच्या, प्रतिष्ठेच्या आणि हाय होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या संगमनेर नगरपरिषदेवर अखेर थोरात तांबे मामा भाच्यांनी विजय खेचून आणला आहे. कारण या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार आणि सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली सत्यजीत तांबे या विजयी झाल्या आहेत. यातून त्यांनी विधानसभेला बाळासाहेब थोरातांचा पराभव करणाऱ्या जायंट किलर अमोल खताळ यांचा वचपा काढला आहे.

तांबेंकडून शिवसेनेच्या खताळांचा पराभव

नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या डॉ. मैथिली तांबे 4 थ्या फेरीअखेर 17 हजार मतांनी आघाडीवर. होत्या त्यावेळीच संगमनेमध्ये आणि तांबे कुटुंबियांकडून विजय साजरा केला गेला. तर यावेळीच महायुतीच्या उमेदवार पिछाडीवर असल्यामुळे विद्यमान शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच यातून तांबे थोरातांनी थोरातांच्या पराभवाचा वचपा काढला आहे.

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; भरत शहा यांनी प्रवीण गारटकर यांना चारली धूळ

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर विधानसभेसाठी गेल्या कित्येक पीढ्यांपासून आमदार मंत्री आणि दिग्गज असे राहिलेल्या थोरात घराण्यांची सत्ता खाताळ यांनी संपवली होती. त्याची राज्यभर चर्चा झाली होती. कारण नवा चेहरा मानले जाणारे शिवसेनेचे अमोल खताळ यांनी थेट कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील नेते राहिलेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव केला होता. हा पराभव थोरात आणि तांबे घराण्याला दुखावणारा होता. ज्याचा वचपा या नगरपरिषद निवडणुकीतून घेण्यात आला आहे. सत्यजीत तांबेंच्या पत्नी अमोल खताळ यांच्या भावाच्या पत्नी असलेल्या सुवर्णा खताळ यांचा पराभव केला आहे.

सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, करमाळ्यात भाजपला रोखण्यात विरोधकांना यश

सत्यजित ताबेंनी मानले मतदारांचे आभार…

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल १६६४४ मतांच्या मताधिक्याने संगमनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली तांबे यांचा विजय झालाय, तसेच ३० पैकी २७ नगरसेवकही निवडून आलेत. संगमनेर सेवा समितीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तमाम संगमनेरकरांचे आभार मानतो. आता संगमनेर २.० च्या माध्यमातून संगमनेरला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ, अशा विश्वास देतो.

follow us