Mumbai Police: ‘गद्दार दिवस’ साजरा करण्याचे ठाकरे गटाचे नियोजन; मुंबई पोलिसांनी पाडले हाणून
Mumbai Police Notice To Thackeray Group: शिवसेना ठाकरे गटाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मात्र असा कुठलाही दिवस साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रतिबंध करण्यात आला आहे. (Thackeray Group) तर मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. शिंदेनी गेल्या वर्षी बंड केल्याने शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्री म्हणजेच २० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केले होते. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने आज खोके दिन, गद्दार दिन म्हणून साजरा केला जात आहे.
ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर तशा प्रकारच्या जोरदार पोस्ट शेअर केल्या जात आहेत. परंतु यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख तसेच माजी नगरसेवकांना आणि काही नेत्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे कोणताही दिन साजरी करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. हे दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना या नोटीसमधून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे. ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस २० जून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस जागतिक खोके दिवस साजरा करावा असे आदेश देण्यात आले आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे- फडणवीसांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कालच्या राज्यव्यापी शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडावरुन एकनाथ शिंदेंवर खोचक टीका केली होती. तर उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचे म्हणत शिंदे-फडणवीसांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.