ShivSena Anniversary : ‘एक नोटीस आली, तेव्हा xxx पातळ झाली, त्यामुळे… ‘ मोदी-शाहंवर टीका अन् मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना ठणकावले

ShivSena Anniversary : ‘एक नोटीस आली, तेव्हा xxx पातळ झाली, त्यामुळे… ‘ मोदी-शाहंवर टीका अन् मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना ठणकावले

ShivSena Anniversary : शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यानिमित्त आजच्या ५७ व्या वर्धापन दिनी या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहेत. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. (Eknath Shinde Criticize Udhav Thackrey on ShivSena Anniversary )

‘श्रीकांतने एक गोष्ट मागितली, पण बाप म्हणून तीही देऊ शकलो नाही’ आठवण सांगताना मुख्यमंत्री भावूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागच वर्ष शिवसेनेच्या इतिहासातील अभूतपूर्व वर्ष होत. गेल्या वर्षी 20 तारखेला आपण क्रांतीला सुरूवात केली. या क्रांतीची उठावाची दखल जगाभरातील देशांनी घेतली. त्यानंतर 30 तारखेला आपण शिवसेनी भाजप युतीची सत्ता स्थापन केली. म्हणून हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. कालही मी ऐकलं नवीन काहीतरी सुरूवात झाली. आजही ऐकलं पण तेच टोमने तेच आरोप दुसरं काही नाही. तिच कॅसेट तेच रिपीटेशन त्यांनी स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा.

Uddhav Thackeray : भाजप दूध पाजतील, पुंगी वाजवतील नंतर टोपलीत घालून सोडून देतील

दरम्यान शनिवारी कार्यकर्त्यांच्या मोळाव्यात उद्धव ठाकरेंनी मोदी- शाह यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आज एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, ‘कालच्या भाषणात मोदी- शाह यांच्यावर टीका केली. पण ते कुठं तुम्ही कुठं. एक नोटीस आली, तेव्हा xxx पातळ झाली होती. त्यामुळे मर्यादेत राहा. जेव्हा मोदींना भेटायला गेले तेव्हा शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई आतमध्ये गेली. आम्हाला सर्व माहिती आहे.’ अशी टीका यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केली.

तसेच ते पुढे असं देखील म्हणाले की, आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार हेच बाळसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. हेच आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. अनेक नेते ज्यात कोणी भाजीवाला, टपरीवाला , रिक्षावाला या लोकांना तुम्ही हिणवता मात्र याचं लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. अनेकांनी आपलं घरदार सोडून शिवसेनेसाठी जीव दिले. अनेक जेलमध्ये गेले. तुम्ही कोठे होता. तुमच्यावर किती केस झाल्या? असा सवाल शिंदेंनी आपल्या भाषणातून ठाकरेंना विचारला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube