‘श्रीकांतने एक गोष्ट मागितली, पण बाप म्हणून तीही देऊ शकलो नाही’ आठवण सांगताना मुख्यमंत्री भावूक

‘श्रीकांतने एक गोष्ट मागितली, पण बाप म्हणून तीही देऊ शकलो नाही’ आठवण सांगताना  मुख्यमंत्री भावूक

ShivSena Anniversary : शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यानिमित्त आजच्या ५७ व्या वर्धापन दिनी या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहेत. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच त्यांनी श्रीकांत शिंदेंची एक आठवण सांगितली यावेळी ते भावूक झाले. ( Eknath Shinde Emotional on Shrikant Shindes Memory in ShivSena Anniversary )

Uddhav Thackeray : भाजप दूध पाजतील, पुंगी वाजवतील नंतर टोपलीत घालून सोडून देतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझा मुलगा श्रीकांत एमबीबीएस झाला, सर्जन झाला त्यानंतर त्याने मला हॉस्पिटल उघडून द्या अशी मागणी केली पण मी त्याचा बाप त्याला हॉस्पिटल उघडून नाही देऊ शकलो. कारण कोणती तरी निवडणुका यायची आणि हॉस्पिटला विषय मागे पडायचा आणि मी कर्ज काढून निवडणुका लढवायचो. मिळेलं ते काम केलं. वयाच्या 21 व्या वर्षी बेलगावच्या जेलमध्ये हा एकनाथ शिंदे 40 दिवस होता. या व्यासपीठावरील नेत्यांनी हेच भोगलयं. माझी आई गेली तरी सभा पूर्ण केली आणि त्यानंतर आईचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळी दिघेसाहेबांनी सांगितलेले शब्द आजही कानात तसेच आहेत की, एकनाथ तुला लाखोंचे अश्रु पुसायचे आहेत. तुला रडून चालणार नाही.

ShivSena Anniversary : पीक कापून नेलं तरी शेती आमच्याकडेच, आम्ही निष्ठेचं पीक घेतो; ठाकरेंचे शिंदेंना टोले

तसेच ते पुढे ठाकरेंवर बोलताना म्हणाले की, मागच वर्ष शिवसेनेच्या इतिहासातील अभूतपूर्व वर्ष होत. गेल्या वर्षी 20 तारखेला आपण क्रांतीला सुरूवात केली. या क्रांतीची उठावाची दखल जगाभरातील देशांनी घेतली. त्यानंतर 30 तारखेला आपण शिवसेनी भाजप युतीची सत्ता स्थापन केली. म्हणून हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. कालही मी ऐकलं नवीन काहीतरी सुरूवात झाली. आजही ऐकलं पण तेच टोमने तेच आरोप दुसरं काही नाही. तिच कॅसेट तेच रिपीटेशन त्यांनी स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा.

पण आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार हेच बाळसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. हेच आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे. अनेक नेते ज्यात कोणी भाजीवाला, टपरीवाला , रिक्षावाला या लोकांना तुम्ही हिणवता मात्र याचं लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. अनेकांनी आपलं घरदार सोडून शिवसेनेसाठी जीव दिले. अनेक जेलमध्ये गेले. तुम्ही कोठे होता. तुमच्यावर किती केस झाल्या? असा सवाल शिंदेंनी आपल्या भाषणातून ठाकरेंना विचारला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube