ShivSena Anniversary : पीक कापून नेलं तरी शेती आमच्याकडेच, आम्ही निष्ठेचं पीक घेतो; ठाकरेंचे शिंदेंना टोले

ShivSena Anniversary : पीक कापून नेलं तरी शेती आमच्याकडेच, आम्ही निष्ठेचं पीक घेतो; ठाकरेंचे शिंदेंना टोले

ShivSena Anniversary : शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यानिमित्त आजच्या ५७ व्या वर्धापन दिनी या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम सुरू आहेत. एक कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तर दुसरा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. (Udhav Thackrey Criticize Eknath Shinde on ShivSena Anniversary )

अंधभक्त, विश्वगुरुंना व्हॅक्सिन देण्याची गरज, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो चोराल पण या लोकांच्या मनातील बाळसाहेब तुम्ही चोरू शकत नाही. अजूनही काही जण जात आहेत. काल देखील काही गेले. जाऊ दे. मागे शिवसेना प्रमुखांनी उदाहरण दिली होती अशी की, मला माध्यमांना सांगाचय की, तुम्ही कोणी तरी जातो आणि लगेच उद्धव ठाकरेंना धक्का अशी बातम्या केल्या जातात. मात्र कसला धक्का तिकडे जपानमध्ये एखाद्या दिवशी भूकंप नाही झाला तर लोकांनी धक्का बसतो. तरी जपान उभं आहे.

Devendra Fadanvis : आम्ही लोटलं नाही, ‘आ जा, आ जा’ म्हणून तुम्हाला खुर्ची बोलवत होती; फडणवीसांचे ठाकरेंवर वार

त्याचप्रमाणे शिवसेना धक्काप्रुफ आहे. तसेच बाळासाहेबांनी सांगितलं होत की, घोड्याचा एक पाय तुटला म्हणून घोडा लंगडत चालत नाही. अस्वलाचा डोक्यावरचा एक केस उपटला तर तो टकला नाही होत. तसंच तुम्ही जे बिकाऊ, भाडोत्री असतील त्यांना घेऊन जा. कारण रोज फोन चालू आहेत. काय करता या ना. गाडले गेलेत फक्त जाहिर व्हायचं. त्या गद्दारांना म्हणा माझ्याकडे यादी पाठवा मी तुम्हाला पाठवून देतो जा.

आपण आता ते पॉडकास्ट सुरू केलं आहे. त्यामध्ये ठाकरे गटातील नेत्यांच्या मुलाखती आहेत. त्यात नितिन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मुलाखती दिल्या. त्यात नितिन देशमुख चांगलं बोलंले आहेत. ते म्हणाले आमचं पीक कापून नेलं असेल पण शेती आमच्याकडे आहे. तर पीक काढण्याची हिंमत त्या शेतकऱ्यामध्ये असते. म्हणून तो शेतीत असतो. त्याच्या हातात नांगर असतो. जास्त गडबड कराल तर नांगरून टाकीन. आम्ही तण काढून टाकतो. चांगलं स्वाभिमानाचं, जिद्दीचं निष्ठेचं पीक आम्ही घेतो. जे बियाण आम्हाला शिवसेनेप्रमुखांनी आम्हाला दिलं आहे. ते बोगस नाही. अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube