भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका

भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका

India Pakistan Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणीवाटप करार स्थगित (India Pakistan Tension) केला होता. या निर्णयाने पाकिस्तानात खळबळ उडालेली असतानाच भारताने आणखी एक दणका दिला आहे. भारताने मोठी कार्यवाही करत बगलिहार धरणाचे पाणी रोखले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिनाब नदीवर बांधण्यात (Indus Water Treaty) आलेल्या बगलिहार धरणाचे पाणी बंद करण्यात आले आहे. यानंतर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे पाणी सुद्धा रोखण्याची योजना सरकार तयार करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, भारत सरकारचा हा निर्णय पाकिस्तानला जबर दणका देणारा आहे. यामुळे पाकिस्तानात लवकरच पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंधू पाणीवाटप करार रद्द झाल्यानंतर आता भारत पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याला नियंत्रित करू शकतो. जम्मू काश्मिरातील रामबनमध्ये बगलिहार धरण आणि उत्तर काश्मिरातील (Jammu Kashmir) किशनगंगा धरणाच्या मदतीने भारत सरकार केव्हाही पाण्याचा प्रवाह नियंत्रित करू शकते. तसेच कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

बगलिहार आणि किशनगंगा धरणे बंद करून भारत झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रवाह कमी करू शकतो. यामुळे पाकिस्तानात दुष्काळ पडण्याची शक्यता राहील. इतकेच नाही तर भारत कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतो. असे केले तर पाकिस्तानात पूर येऊन सारेकाही उद्धवस्त होऊ शकते. सिंधू पाणीवाटप करार स्थगित झाल्याने भारताला हा अधिकार मिळाला आहे. तसेच रोज किती पाणीसाठा आहे, किती पाणी सोडले जाणार आहे याची माहिती पाकिस्तानला देण्याच्या बंधनातून भारत आता बाहेर पडला आहे.

कंगाल पाकिस्तान! पैशांसाठी हत्यारं विकली, आता चारच दिवसांचा शस्त्रसाठा; धक्कादायक अहवाल उघड

पहलगाम हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया

22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांचा धर्म विचारून पर्यटक हिंदू असल्याची खात्री करून घेतली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांच्या या कृत्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. भारत सरकारनेही तेव्हापासून पाकिस्तानशी उरलेसुरले संबंधही तोडून टाकले आहेत. पाकिस्तानला सर्वाधिक धक्का देणारा निर्णय भारताने घेतला. सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून भारताने पाकिस्तानला मोठ्या संकटात टाकले आहे.

काय होता सिंधू पाणीवाटप करार

सिंधू पाणीवाटप करार सन 1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने अस्तित्वात आला होता. या करारानुसार सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळते. तर रावी, ब्यास आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारत वापरत होता. परंतु, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर कार्यवाही करत हा करारच स्थगित करून टाकला.

पाकिस्तानला आणखी एक धक्का! भारतानंतर आता ‘या’ देशांनीही पाकिस्तानी हवाई हद्द टाळली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube