कंगाल पाकिस्तान! पैशांसाठी हत्यारं विकली, आता चारच दिवसांचा शस्त्रसाठा; धक्कादायक अहवाल उघड

कंगाल पाकिस्तान! पैशांसाठी हत्यारं विकली, आता चारच दिवसांचा शस्त्रसाठा; धक्कादायक अहवाल उघड

India Pakistan Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव प्रचंड (India Pakistan Tension) वाढला आहे. भारत केव्हाही हल्ला करील अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य अलर्ट (Pakistan Army) आहे. पण यातच आता पाकिस्तानी सैन्याला हादरविणारी बातमी आली आहे. पाकिस्तानचे सैन्याला (Pahalgam Terror Attack) सध्या दारूगोळ्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. एनआयए वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याकडे फक्त 96 तास पुरेल इतकाच शस्त्रसाठा शिल्लक आहे. म्हणजेच एखादे मोठ्या युद्धाला तोंड फुटले तर पाकिस्तान फक्त काही तासच युद्धाच्या मैदानात तग धरू शकतो.

आता हे संकट निर्माण होण्यामागे कारणही आहे. पाकिस्तानने नुकताच मोठा शस्त्रसाठा युक्रेनला (Ukraine) दिला आहे. 155mm आर्टिलरी शेल्स मोठ्या प्रमाणात पुरवठा केल्यामुळे पाकिस्तानचा साठा संपला आहे. पाकिस्तानच्या आर्टिलरी आधारित युद्ध नीतीसाठी हे साहित्य खूप महत्वाचे आहे. पैसे मिळवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने हा उद्योग केल्याचेही आता समोर आले आहे

पाकिस्तानातील हत्यार निर्माण करणारी कंपनी पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरी आता जुनी उपकरणे आणि घरगुती मागणी सुद्धा पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही. कंपनीने देखील हे मान्य केले आहे.

Pahalgam Attack : मोठी बातमी! पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी हेर पकडले, धक्कादायक माहिती समोर…

एनआयएच्या रिपोर्टनुसार 2 मे रोजी कोअर कमांडर्सची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत हत्यारांच्या कमतरतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी काळजीत पडले आहेत. अस्वस्थही झाले आहेत. जर भारताविरुद्ध युद्ध सुरू झालं तर आपण किती दिवस टिकू अशी चिंता या अधिकाऱ्यांना सतावत आहे. या काळजीने त्यांची रात्रीची झोप उडाली आहे.

माजी सैन्य प्रमुख जनरल कमर जावेद बाजवाने आधीच इशारा दिला होता. पाकिस्तानात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. देशावरील कर्ज सातत्याने वाढत चालले आहे. परकीय चलनाचा साठा वेगाने घटत आहे. यामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. याच संकटामुळे सैन्याला आपले प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. रेशनमध्ये कपात आणि युद्धाभ्यास सुद्धा रद्द करावा लागला आहे. इंधनाची टंचाई जाणवत आहे.

भारत पाकिस्तान तणाव वाढला

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. वाढलेला तणाव पाहता पाकिस्तानने सीमेजवळ नवीन डेपो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण दारूगोळच नाही तर अशा डेपोंचे कोणतेही रणनितिक महत्व नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने त्यांच्याकडील हत्यारे दुसऱ्या देशांना दिली आणि आता स्वतः कंगाल झाला आहे. आर्थिक फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता पण या निर्णयामुळे पाकिस्तानचे दीर्घकालीन रणनितिक नुकसान झाले आहे.

पाकिस्तानला आणखी एक धक्का! भारतानंतर आता ‘या’ देशांनीही पाकिस्तानी हवाई हद्द टाळली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube