शेकापचा मंच, मराठीचा मुद्दा, फडणवीसांवर तुटून पडले राज ठाकरे!

शेकापचा मंच, मराठीचा मुद्दा, फडणवीसांवर तुटून पडले राज ठाकरे!

Raj Thackeray :  शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पनवेल येथे आयोजित मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, आज या मेळाव्यात फक्त जयंत पाटलांच्या प्रेमाखातर तब्येत खराब असूनही आलो. गेल्या 2 दिवसांपासून तब्येत खराब आहे.

पूर्वीचे आजार कसे ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येत नाही.  हल्लीचे आजार आणि सध्याचं राजकारण फारसं वेगळं नाही. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातुन या पक्षात आला. मग आपण म्हणतो काय झालं ? व्हायरल होता. महाराष्ट्रात हे व्हायरल खूप फिरत आहे असा टोला राज ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना लावला. तसेच राजकारणात आज लोकांचं मोठं मन संकुचित व्हायला लागले आहे. असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यात लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करत. पण महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचा विचार करत नाही. याचा भीषण स्वरुप म्हणजे रायगड जिल्हा आहे. आज रायगडच्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. शेतकरी बरबाद होत आहे. दुसऱ्या बाजुला उद्योगधंदे येत आहे मात्र त्यात देखील बाहेरच्या राज्यातील लोकांना काम मिळत आहे. रायगडमधील तरुण तरुणी येथे काम मिळत नाही. त्यांना काम मिळाले पाहिजे आणि यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असं राज ठाकरे म्हणाले.

तर  एका मुलाखतीमध्ये गृहमंत्री अमित शाह ठणकावून सांगत आहे मी हिंदी नव्हे गुजराती भाषिक आहे. यांचं काय राजकारण चाललंय ते समजून घ्यायला हवं असं देखील राज ठाकरे या मेळाव्यात बोलताना म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यात बाहेरील राज्यातील लोकांना शेत जमीन घेता येत नाही. गुजरातमध्ये असा कायदा करण्यात आला आहे. जर बाहेरील राज्यातील लोकांना शेत जमीन खरेदी करायची असेल तर फेमा नावाचा एक कायदा आहे. या कायदानुसार आरबीआय बँककडून विशेष परवानगी घ्यावी लागते. असं देखील या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्रातले अनेक व्यापार गुजरातला गेले आहे. असा आरोप देखील त्यांनी केला.

तर आज राज्यात सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगडमध्ये डान्सबार कसे? असा सवाल देखील त्यांनी या मेळाव्यात बोलताना उपस्थित केला.

हा चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार’ च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य 12 सप्टेंबरला उलगडणार! 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube