शौचालय बंद, पाणी नाही; संयम सुटला तर रस्त्यावर…मराठा आंदोलक संतापले, प्रशासनाकडून छळ…

Toilets Closed No Water Maratha Protesters Angry : नवी मुंबईत मराठा आंदोलन (Maratha Protest) आता अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे. आंदोलकांनी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असली तरी, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. विशेषत: पाणीटंचाई आणि बंद शौचालयांमुळे आंदोलकांचे हाल सुरूच (Mumbai) आहेत. श्रीमंत महानगरपालिकेने पाणी का रोखले? असा संतप्त सवाल मराठा आंदोलकांनी (Manoj Jarange Patil) केला आहे.
प्रशासन छळ का करत आहे?
आंदोलकांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की, नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी स्वच्छतागृह बंद आहेत, तर पिण्यासाठी किंवा आंघोळीकरता पाणी उपलब्ध करून दिले गेलेले नाही.
भारतावर नवीन संकट! तेल-गॅस पुरवठा बंद होणार? ट्रम्प यांचे युरोपियन देशांना आदेश…
प्रशासन आमचा छळ का करत आहे? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मनोज दादा जोपर्यंत आदेश देणार नाही, तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही. आम्ही गावाकडून राशन आणलं आहे. पाणी आणलं होतं, परंतु ते संपलं. आता एक बाटली पाण्यासाठी वणवण भटकत आहोत. येथील स्थानिक नागरिकांना त्रास होईल, असं आम्ही वागत नाही. परंतु जर आमचा संयम सुटला तर प्रशासनाला जड जाईल, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
संयम सुटला, तर मोठ्या संख्येने रस्त्यावर…
एका संतप्त आंदोलनकर्त्याने सांगितले, राहायला जागा दिली, पण पाणीच नाही, शौचालये बंद आहेत. आंघोळ करायची तर कुठे जावे? इतकी श्रीमंत असलेली महानगरपालिका पाणी देऊ शकत नाही का? हे दुर्दैवी आहे. आंदोलकांचा इशारा आहे की, जर लवकरच या समस्या सोडविल्या नाहीत, तर त्यांचा संयम सुटेल आणि मोठ्या संख्येने ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.
ब्रेकिंग! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, मध्यरात्री डॉक्टरांकडून तपासणी
स्थानिक प्रशासनाने या तक्रारी गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी लढणाऱ्या मराठा बांधवांना मूलभूत सोयी नाकारल्या जाणे हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.