ब्रेकिंग! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, मध्यरात्री डॉक्टरांकडून तपासणी

Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.
मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उद्या सुरु राहणार की नाही?, मुंबई पोलिसांचं अर्जावर काय आहे मत?
आंदोलकांची गैरसोय कायम
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. मात्र, तिसऱ्या दिवशीही आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई महापालिकेकडून आंघोळीकरिता पाण्याचा टँकर पाठवण्यात आला. परंतु केवळ एकच टँकर आल्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. आंदोलकांनी ‘नैसर्गिक विधीसाठी पाणी उपलब्ध करून द्या, अशी तक्रार नोंदवली आहे.
अन्न आणि वाहतुकीची मागणी
मुंबई व नवी मुंबई परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. त्यांना आंदोलनस्थळी पोहोचवण्यासाठी योग्य ती वाहतूक सुविधा मिळावी, अशी मागणी होत आहे. नवी मुंबई परिवहन, बेस्ट आणि एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडाव्यात, अशी विनंती आंदोलकांनी केली आहे. विशेषतः वाशीहून आझाद मैदानापर्यंत बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; ओबीसी संघटना जरांगेंविरोधात आक्रमक
दरम्यान, आंदोलकांसाठी अन्नसाहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समन्वयक विनोद पोखरकर यांनी मुंबईतील नागरिकांना ‘आंदोलकांना चटणी-भाकरी पुरवा’ असे आवाहन केले आहे.
पोलिसांकडून अडवणूक…
मुंबईकडे येणाऱ्या मराठा आंदोलकांची पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या अनेक गाड्या पोलिसांकडून रोखल्या जात आहेत, अशी तक्रार आंदोलकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित होऊ इच्छिणाऱ्या समाजबांधवांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.