Maratha Protest : जरांगेंचं वादळ मुंबईत; सरकराच्या हालचाली सुरू, पहिली प्रतिक्रिया आली

Radhakrishna Vikhe on Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील (Manoj Jarange patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (Mumbai News) आंदोलन सुरू केले आहे. यावर बोलताना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या मागण्यासंदर्भात यापूर्वीच सरकारकडे निवेदन पाठवले आहे याबाबत आमची चर्चा सुरू आहे. समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील पुढे म्हणाले, जरांगे पाटलांच्या मागण्या विचारात घेतल्या आहेत. त्यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार लोकांचे दाखले देण्याचे कार्यवाही सुरू आहे. जे राहिले आहे त्यांचा देखील अभ्यास केला जाईल त्यांनाही दाखले दिले जातील त्याबाबतची ही कार्यवाही केली जाईल. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटलांकडून नव्याने काही निवेदन हे शासनाला प्राप्त होतील. त्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल.
जरांगे पाटील आता मुंबईला पोहोचले असून त्यांच्या सहकाऱ्यांशी काही चर्चा करायची आवश्यकता वाटल्यास आपण चर्चा करू कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. सगळ्यांची भावना एकच आहे आरक्षणाबाबत योग्य मार्ग निघाला पाहिजे. त्यांची चर्चेची तयारी आहे. आमची देखील चर्चेची तयारी आहे. दोन्ही बाजूने सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे लवकरच चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली.
वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन; विषय नेमका काय?
ओबीसीतून आरक्षण मिळावे ही जरांगे यांनी मागणी केली आहे यावर बोलताना विखे म्हणाले आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही अशी शासनाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दहा टक्के आरक्षण देण्यात आले ते अद्यापही टिकून आहे त्यामुळे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आपण दिलेले आहे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे किंवा त्यांचं निवेदन आम्हाला प्राप्त झाल्यानंतर त्यानंतरच त्यावर भाष्य करू.
मविआ नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी
महाराष्ट्राचे जे नेते आहे शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे पुढारी आहेत देशपातळीवर देखील राहुल गांधींची वेगळी भूमिका आहे. काँग्रेसला स्वतःची तर भूमिकाच नाही. दुर्दैवाने त्यांचे पुढारी वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते यांनी देखील आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे का, देऊ शकतो का मात्र यावर त्यांच्याकडून कोणीच बोलत नाही. राजकारण करण्यापेक्षा एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची गरज आहे असेही विखे पाटील यांनी सांगितले.
‘सरकार उलथवण्यासाठी आंदोलन’ ; लक्ष्मण हाकेंनी थेट अजित पवारांचं नाव घेतलं, नेमकं काय म्हणाले?