वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन; विषय नेमका काय?
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.

Uddhav Thackeray Press Conference : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे तर विरोधी इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. सुदर्शन रेड्डी यांनी इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आज त्यांनी शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.