फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा

फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा

Laxman Hake Statement : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी ओबीसी नेते त्याला तीव्र विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) एक धडाकेबाज आरोप (Ajit Pawar) करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

फडणवीस सरकार उलथवण्याचा कट?

पुण्यात पत्रकार परिषद घेताना लक्ष्मण हाके म्हणाले, “जरांगे मुंबईकडे निघाले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे राजकीय अजेंडा असल्याचे दाखवून दिले. ते म्हणाले की, मी हे सरकार उलथवणार आहे. आधीपर्यंत आमचा असा समज होता की विरोधी पक्ष सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. पण आता मी जबाबदारीने सांगतो की, फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसोबत अजित पवारांचे आमदार आणि खासदारदेखील सहभागी आहेत.”

वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन; विषय नेमका काय?

सरकार बदलण्यासाठीचे षडयंत्र

हाके यांनी पुढे भाष्य करताना म्हटले की, मुळात हे आंदोलन आरक्षणासाठी नसून सरकार बदलण्यासाठीचे षडयंत्र आहे. जरांगे हे फक्त मुखवटा आहेत. त्यांच्या आडून काही आमदार व खासदार राजकीय स्वार्थ साधत आहेत. मराठा बांधवांना माझी विनंती आहे की, जर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला घुसवले गेले, तर ओबीसींना दिलेले संरक्षणच संपेल. राज्यकर्त्या समाजाच्या दडपशाहीपासून वाचवण्यासाठीच ओबीसी आरक्षण अस्तित्वात आहे. पण हेच राज्यकर्ते जर ओबीसी कोट्यात शिरले, तर खऱ्या अर्थाने वंचित समाजाचे नुकसान होईल.

जरांगेंना भेटा, चर्चा करा! संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘आंदोलनाची चेष्टा…’

रवींद्र चव्हाणांवर थेट हल्लाबोल

यावेळी लक्ष्मण हाके यांनी खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण यांनी जरांगेंना लेटरहेडवरून पाठिंबा दर्शविला आहे. पण त्यांनी आता स्पष्ट सांगावे की, ओबीसी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे? तुम्हाला खरंच हे आरक्षण संपवायचं आहे का? आणि जर ते संपवलं, तर ओबीसी समाज स्पर्धेत कसा टिकणार?”

हाकेंना नोटीस, जरांगेंना रेड कार्पेट

सरकारवर दुजाभावाचा आरोप करताना हाके पुढे म्हणाले, “कायद्यासमोर सर्वजण समान असायला हवेत. मला गेवराई येथे गेल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली, तेव्हा कोणताही प्रतिबंधक आदेश नव्हता. पण जरांगेंना मात्र रेड कार्पेट अर्पण केले जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात तरी त्यांना विशेष वागणूक दिली जाते. हा सरळसरळ अन्याय आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube