Laxman Hake : आता आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाहीत…
Laxman Hake : तुमचं आमचं आरक्षण वाचवायला फुले-शाहू-आंबेडकर येणार नाहीत, त्यामुळे आपल्यालाच ते वाचवावं लागणार असल्याचं मोठं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलंय. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. अशातच आता ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हाके यांनी ओबीसी बचाव जनआक्रोश आंदोलन हाती घेतलंय. जालन्यातील दोदडगाव मंडल स्तंभाला अभिवादन करुन त्यांनी यात्रा सुरु केलीयं. ते जालन्यात बोलत होते.
तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकऊ नये; सुषमा अंधारेंचा अमित शहांच्या टिकेवर पलटवार
लक्ष्मण हाके म्हणाले, तुमचं आमचं आरक्षण वाचवायला आता फुले-शाहू-आंबेडकर येणार नाहीत, त्यामुळे आपल्यालाच वाचवावं लागणार आहे. काही लोकं बेकायदेशीर आंदोलन करुन मागासवर्गीयांचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता केलायं. मात्र, यावेळी त्यांचा बोलण्याचा रोख मनोज जरांगे यांच्याकडेच असल्याचं दिसून आलं.
कोल्हापूर जिल्ह्यात कोसळधारा; पंचगंगा धोका पातळी गाठण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
तसेच राज्यातील गावगाड्यातल्या लोकांपर्यंत लोकशाहीची तत्व गेली पाहिजे, त्यांच्यात स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. तुमचं आमचं आरक्षण वाचवायला आता शाहू फुले आंबेडकर येणार नाहीत. तर आपल्यालाच ते वाचवावं लागेल. त्यामुळं सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जातींनी एकत्र आलं पाहिजे, असं लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलंय.
कायदा सांगतो की, एका व्यक्तीला एकच आरक्षण घेता येतं, असं असेल तर मग एक व्यक्ती तीन तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ कसा घेऊ शकतो. समांतर आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीतील हजारो जागा ढापल्या जात आहेत. वेठीस धरल्या जात आहेत. मनोज जरांगे म्हणतात, की धनगर ओबीसीतून वेगळा आहे, पण ओबीसीच्या 27 टक्क्यांमधून धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलं जातं. असं असेल तर मग धनगर ओबीसीतून बाहेर कसा? मनोज जरांगे, ओबीसीत फुट पाडण्याचे फालतूगिरी बंद करा, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.