लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार

लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार

Laxman Hake Hunger Strike Update : लक्ष्मण हाके आज उपोषण सोडण्याची शक्यता. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील सहा मंत्री आज उपोषस्थळी लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. (Obc reservation) आज हाके हे आपलं उपोषण सोडण्याची शक्यता आहे. गेली 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे  जाल्ह्यातील वडीगोद्री येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. (Chhagan Bhujbal) ओबीसी आरक्षणाचं संरक्षण सरकार कसं करणार आहे असा त्यांचा मुद्दा आहे. कालच सरकारच एक शिष्टमंडळ हाके यांच्याशी चर्चा करून गेलं. त्यानंतर मुंबईत शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात काल बैठकही झाली. त्या बैठकीसाठी भुजबळ उपस्थित होते.

खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार, CM शिंदेंचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पाच मंत्री, एक आमदार एक माजी आमदाराचं शिष्टमंडळ आज  पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वडीगोद्री येथील उपोषणस्थळी जाणार आहेत.

हाकेंच्या भेटीला  कोण-कोण?

  • मंत्री छगन भुजबळ
  • मंत्री उदय सामंत
  • मंत्री धनंजय मुंडे
  • मंत्री गिरीश महाजन
  • मंत्री अतुलसावे
  • मंत्री संदीपान भुमरे
  • आमदार गोपिचंद पडळकर
  • माजी आमदार प्रकाश शेंडगे

 

लक्ष्मण हाकेंची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी गुरूवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षणासंबंधी सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला विरोध केला. त्यानंतर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच, राज्यात ज्या प्रमाणे मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाच्या विकासासाठीही ओबीसी नेत्यांची उपसमिती निर्माण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube