Chhagan Bhujbal यांची भूमिका ठरली; मोदींकडे मोठी मागणी करत, हाकेंसोबत मैदानात उतरणार

Chhagan Bhujbal यांची भूमिका ठरली; मोदींकडे मोठी मागणी करत, हाकेंसोबत मैदानात उतरणार

Chhagan Bhujbal in action mode for OBC reservation : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यासह राज्यात ओबासी नेते मराठ्यांना ओबीसीतू आरक्षण मिळू नये यासाठी (OBC Reservation) आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्यातील ओबीसी बांधव भेटीसाठी आले होते. या बैठकीमध्ये भुजबळांनी ओबीसी आंदोलना बाबत आपली भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांच्याकडे जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

आमचे नावे पुस्तकातून वगळा नाही तर थेट खटला दाखल करणार; पळशीकर, युगेंद्र यादवांचा एनसीईआरटीला इशारा

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, राज्यातील मला भेटायला आलेल्या ओबीसी बांधवांची मागणी आहे की, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी. तसेच एससी आणि एनटी प्रमाणे ओबीसींना देखील निधी मिळावा. तसेच आम्ही चर्चा करून यावरती मार्ग काढू. त्यामुळे आंदोलकांनी अशाप्रकारे आत्मसर्पणाचा मार्ग निवडू नये. असं भुजबळ म्हणाले.

महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

तसेच सरकार तुमच्या मागण्या मान्य करत नसेल तर मी देखील तुमच्यासोबत आंदोलनात उतरायला तयार आहे. असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान महायुती आणि अजित पवार गट यामध्ये भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात त्यांनी सरकारच्या विरोधात अशा प्रकारे आंदोलनात उतरण्याची भूमिका घेतल्याने या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

लेखी आश्वासनापर्यंत उपोषणार ठाम

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला. मी 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवला आहे. जरांगे यांचा हा दावा खरा असेल तर मूळ ओबीसींचे आरक्षण कसे टिकेल, हे सरकारने सांगावे असेही हाके म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज