आमचे नावे पुस्तकातून वगळा नाही तर थेट खटला दाखल करणार; पळशीकर, युगेंद्र यादवांचा एनसीईआरटीला इशारा
Letter from Suhas Palashikar and Yogendra Yadav to NCERT : बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून (12th Political Science Book) बाबरी मशीद (Babri Masjid) प्रकरणातील मोठी काटछाट करण्याच आली. यासोबतच पुस्तकातील अभ्यासक्रमात देखील बदल करण्यात आलेत. त्यानंतर पाठ्यपुस्तकांचे माजी सल्लागार सुहास पळशीकर (Suhas Palashikar) आणि योगेंद्र यादवांनी (Yogendra Yadav) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) पत्र लिहून पुस्तकातून आपली नावे वगळण्याची मागणी केली. आमचे नावे पुस्तकातून वगळली नाहीतर थेट खटला दाखल करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी सोमवारी (दि. 17 जून ) एनसीईआरटीचे प्रमुख डी पी सकलानी यांना हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणाले की, एका वर्षाहून अधिक काळापासून आम्ही या पुस्तकनिर्मितीचा भाग नाही आणि सकलानी यांना आपली नावे पुस्तकातून वगळण्याची यापूर्वी विनंती केली होती. मात्र, आता एनसीआईटीने आमच्या नावांसहीत पाठ्यपुस्तकांचे मुद्रण केले.
लोकसभेचा वचपा काढण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुनील तटकरे उद्या नगरच्या दौऱ्यावर
त्यांनी पुढं लिहिलं की, NCERT ने पुस्कात नव्याने काही भाग जोडला आहे, जो मूळ पाठ्यपुस्तकांच्या आत्म्याशी सुसंगत नाहीत. NCERT ला आमच्यापैकी कोणाचाही सल्ला न घेता ही पाठ्यपुस्तके विकृत करण्याचा कोणताही नैतिक किंवा कायदेशीर अधिकार नाही. आम्ही स्पष्ट नकार देऊनही आमच्या नावाखाली पुस्तके प्रकाशित केली जात आहे, असं पत्रात म्हटलं.
NCERT ने आमच्या माघारीराज्यशास्त्राची अशी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची नाहीत. आमच्या नावांसह प्रकाशित झालेल्या या पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या बाजारातून ताबडतोब मागे घेण्यात याव्यात, NCERT तत्काळ सुधारात्मक कारवाई केली नाही तर आम्हाला कायदेशीर मार्ग स्वीकारून खटला भरू, असा इशारा त्यांनी दिला.
पुस्तकात काय बदल केले?
इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारित आवृत्तीत बदल केल्यानंतर हे पत्र लिहिले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात बाजारात आलेल्या सुधारित पाठ्यपुस्तकात बाबरी मशिदीचा नावानिशी उल्लेख केलेला नाही, तिला “तीन घुमट असलेला ढाचा” असे संबोधले आहे, आणि आधीच्या आवृत्तीतील तपशील हटवले आहेत, अयोध्या प्रकरणात भाजपची गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर उलळेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि अधोध्येतील हिंसाचारानंतर भाजपने व्यक्त केलला खेद या घटनांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.