Operation Sindoor एनसीईआरटी अभ्यासक्रमात, इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंत शिकवली जाणार सैनिकांची शौर्यगाथा

NCERT Syllabus : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन

NCERT Syllabus

NCERT Syllabus : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले होते. तर आता ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी अभ्यासक्रमात (NCERT Syllabus) ऑपरेशन सिंंदूर समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता तिसरी ते बारावीच्या पुस्तकांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत शिकवले जाणार आहे. यासाठी एनसीईआरटीने विशेष मॉड्यूल जारी केले आहे.

या मॉड्यूलमध्ये असे सांगण्यात आले आहे की ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती. तर ती शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेले पाऊल देखील होते. यासोबतच, हे ऑपरेशन प्राण गमावलेल्या लोकांचा सन्मान परत करण्याचा प्रयत्न देखील होता. ऑपरेशन सिंदूरच्या सुमारे तीन महिन्यांनंतर, ते पूरक साहित्य म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

भारतीय लष्कराच्या कारवाईची माहिती पुढे या मॉड्यूलमध्ये असे म्हटले आहे की, जरी पाकिस्तान पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग नाकारतो मात्र ते पाकिस्तानी लष्करी आणि राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसार पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. तसेच भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय हवाई हल्ले देखील करण्यात आले. असं देखील या मॉड्यूलमध्ये म्हटले आहे.

दहशतवादी अड्डे नष्ट

ऑपरेशन सिंदूरमध्ये नऊ दहशतवादी अड्ड्यांपैकी सात अड्डे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. भारतीय हवाई दलाने मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. हे सर्व लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. असं देखील या मॉड्यूलमध्ये म्हटले आहे.

मोठी बातमी, पावसामुळे झेलम, डेक्कन एक्सप्रेससह 14 रेल्वे रद्द; पहा संपूर्ण लिस्ट 

तर दुसरीकडे एनसीईआरटी अभ्यासक्रमात, भारत सरकारची भूमिका ठामपणे मांडण्यात आली आहे की या काळात कोणत्याही नागरिकाचे नुकसान झाले नाही. असे म्हटले जाते की प्रत्येक लक्ष्याची दोनदा तपासणी करण्यात आली. या काळात फक्त दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आला. या कारवाईने दाखवून दिले की भारत कोणत्याही किंमतीत दहशतवाद्यांच्या मालकांना सोडणार नाही.

follow us