‘ऑपरेशन सिंदूरवर शंका घेणाऱ्यांना… जोडे मारो’ मंत्री राधाकृष्ण विखेंचा राहुल गांधींवर निशाणा

Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा थेट निशाणा त्यांनी साधला.
ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची ताकद जगासमोर
डॉ. विखे म्हणाले की, पहलगाममधील दुर्दैवी घटनेनंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून दहशतवाद्यांची तळ उध्वस्त केली. ही अशी घटना आहे की, जिचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे. ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) आत्मनिर्भर भारत काय चमत्कार करू शकतो, हे जगासमोर ठळकपणे आले. मात्र, विरोधक त्यावर प्रश्न उपस्थित करून भारतीय जवानांच्या शौर्यावर पाणी फेरत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ दोन सीनियर खेळाडूंची सुट्टी; कर्णधार कोण?
राहुल गांधींवर थेट हल्ला
राहुल गांधींवर थेट निशाणा साधताना विखे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरबाबत (Politics) राहुल गांधींसारखे नतदृष्ट लोकं त्याच्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. याबाबत प्रत्येक मंडलातील कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांला जोडे मारो आंदोलन केले पाहिजे.
ऑपरेशन सिंदूरचा विजयाबाबत आनंद व्यक्त करण्यापेक्षा राहुल गांधी आणि त्यांची पिलावळ ऑपरेशन सिंदूरच्या हेतूवर संशय घेत आहे. त्यानंतर लष्करांकडून सत्य समोर आल्यानंतर राहुल गांधींचे खोटं बाहेर पडले. हे लपवण्यासाठी आता हे व्होट चोरीचा प्रकरण बाहेर काढल्याचा आरोप मंत्री विखे यांनी केला आहे.