जिममध्ये नशेचे इंजेक्शन! श्रीरामपूरमध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांची कारवाई

जिममध्ये नशेचे इंजेक्शन! श्रीरामपूरमध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांची कारवाई

Mephentermine Injection Sale Racket Busted : जिममध्ये (Gym) फिटनेसच्या नावाखाली तरुणांना ‘नशेचे इंजेक्शन’ देत असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे. श्रीरामपूरमध्ये (Srirampur) पोलिसांनी धाड टाकत मेफेन्टरमाइन इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश केला. ही कारवाई समोर आल्यानंतर शहरात (Ahilyanagar Crime) एकच खळबळ उडाली आहे. शरीर क्षमता वाढवण्याच्या नावाखाली जिममध्ये मेफेन्टरमाइन इंजेक्शन विक्री (Mephentermine Injection Sale Racket) करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला.

मेफेन्टरमाइन इंजेक्शनची विक्री

जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना ताकद वाढवण्यासाठी आणि नशेसाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शन परवाना नसताना विकणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या साथीदारावर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही अवैध इंजेक्शन विक्रीविरोधातील आतापर्यंतची दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

अमेरिकेचा भारताला मोठा धक्का! अमेरिकन ट्रेड टीमचा भारत दौरा रद्द; व्यापार करार अधांतरी

पोलिसांनी रचला सापळा

दैनिक ‘सकाळ’ने सातत्याने मेफेन्टरमाइन इंजेक्शनच्या गैरवापराबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. गुप्त माहितीच्या आधारे शिल्पा शेळके नावाची महिला नॉर्दर्न ब्राँच परिसरात निळ्या रंगाच्या स्कूटरवरून इंजेक्शन घेऊन येणार असल्याचे पोलिसांना कळले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस कर्मचारी अंबादास आंधळे, मीरा सरग आदींनी सापळा रचून तिला पकडले.

कायदेशीर कारवाई

तिच्या स्कूटरच्या डिकीतून तब्बल 16 हजार 740 रुपयांचे मेफेन्टरमाइन इंजेक्शन जप्त करण्यात आले. चौकशीत तिच्याकडे औषध विक्रीचा परवाना किंवा खरेदी-विक्रीची बिले नसल्याचे उघड झाले. पुढील चौकशीत समोर आले की, शिल्पा ही इंजेक्शन्स गणेश मुंडे (रा. स्वप्ननगरी, गोंधवणी, श्रीरामपूर) यांच्या साथीने तरुणांना व जिममध्ये जाणाऱ्यांना विकत होती.

ब्रेकिंग! प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या घरावर अंदाधुंद गोळीबार; अज्ञातांकडून 25 राउंड फायरिंग

औषध प्रशासनाचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, मेफेन्टरमाइन हे ‘एच’ प्रवर्गातील औषध असून ते केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच विक्री करता येते. मात्र, नशेसाठी अन् शरीर क्षमता वाढवण्यासाठी या औषधांचा सर्रास गैरवापर होतो. यामुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढतो. या प्रकरणी शिल्पा शेळके आणि गणेश मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube