धुळ्यात रंगला सापाच्या ‘बर्थडे पार्टी’चा थरार! केक कापून नागोबाचा वाढदिवस साजरा, युवक वनविभागाच्या ताब्यात

धुळ्यात रंगला सापाच्या ‘बर्थडे पार्टी’चा थरार! केक कापून नागोबाचा वाढदिवस साजरा, युवक वनविभागाच्या ताब्यात

Youth Celebrated Snake Birthday Party : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धीसाठी पोरं काय करतील, त्याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी वेडेवाकडे प्रयोग करणं अखेर धुळ्यातील (Dhule) एका युवकाच्या अंगलट आलंय. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राज साहेबराव वाघ या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस केक कापून (Snake Birthday Party) साजरा केला. एवढंच नव्हे तर त्याने व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करून मित्रपरिवाराला दाखवला. त्यामुळे तो थेट वनविभागाच्या रडारवर आला.

नेमकं काय घडलं?

29 जुलै 2025 रोजी नागपंचमीच्या दिवशी आरोपी राज वाघ याने शिरपूर (Crime News) तालुक्यातील बुडकी गावातून एक नाग पकडला. त्यानंतर त्याला घरी आणून केक कापून ‘बर्थडे सेलिब्रेशन’ केलं. या विचित्र कार्यक्रमाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकण्यात आला. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत नाग हा संरक्षित प्रजातींमध्ये मोडत असल्याने वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली.

अमेरिकेचा भारताला मोठा धक्का! अमेरिकन ट्रेड टीमचा भारत दौरा रद्द; व्यापार करार अधांतरी

वनविभागाची कारवाई

सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर आणि वनक्षेत्रपाल बोराडी यांच्या नेतृत्वाखाली सांगवी आणि बोराडी रेंजच्या स्टाफने आरोपीस ताब्यात घेतलं. त्याच्या घरातून दोन प्लास्टिकच्या बरण्या (सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या), एक मोबाईल फोन (Dhule Crime) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9 व 51 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत ऐतिहासिक क्षण! रघुजीराजे भोसले यांची तलवार पुन्हा मायभूमीत, 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन

आरोपीची कबुली

चौकशीत आरोपीने मान्य केलं की, नाग बुडकी गावाजवळून पकडून आणला होता. नागपंचमीला ‘बर्थडे सेलिब्रेशन’ केल्यानंतर त्याच रात्री तो जंगल भागात सोडल्याचंही त्याने सांगितलं. आरोपीला अटक करून शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. वनक्षेत्रपाल बोराडी किरण गिरवले यांनी सांगितलं की, वन्यजीव हा निसर्गाचा वारसा आहे. त्यांच्याशी अशा प्रकारे खेळ करणं गंभीर गुन्हा आहे. सोशल मीडियासाठी व्हायरल व्हिडिओ बनवताना कायद्याची काळजी घ्यावी, अन्यथा तुरुंगवासाला सामोरं जावं लागू शकतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube