मुंबईत ऐतिहासिक क्षण! रघुजीराजे भोसले यांची तलवार पुन्हा मायभूमीत, 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन

मुंबईत ऐतिहासिक क्षण! रघुजीराजे भोसले यांची तलवार पुन्हा मायभूमीत, 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन

Raghuji Bhosales Historical Sword Will Arrive In Mumbai : मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जिवंत वारसा असलेली श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार (Raghuji Bhosales Historical Sword) अखेर आपल्या मायभूमीत दाखल होत आहे. सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी सकाळी ही तलवार इंग्लंडहून मुंबईत (Mumbai) येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे या तलवारीचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी जोरदार स्वागत केले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Aashish Shelar) सकाळी 1o वाजता विमानतळावर ही तलवार स्वीकारतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीद्वारे चित्ररथावर तलवार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडे नेण्यात येईल.

मॅक्सवेलचं तुफान! थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

लोकार्पण सोहळा

संध्याकाळी 6 वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (Raghuji Bhosales Sword) येथे “सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन” या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तलवारीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार प्रमुख उपस्थित राहतील.

WhatsApp Image 2025 08 17 At 10.05.38 AM

WhatsApp Image 2025 08 17 At 10.05.38 AM

मॅक्सवेलचं तुफान! थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली

या कार्यक्रमाला श्रीमंत रघुजीराजे भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, स्थानिक खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील.

तलवारीचे प्रदर्शन

श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या इंग्लंडमधून आणलेल्या तलवारीचे तसेच बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन 19 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत सकाळी 11 ते सायं 7 या वेळेत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथील कला दालनात भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube