रशिया-युक्रेन युद्धविरामात युरोपीय आयोगाची आडकाठी; डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगणार?

रशिया-युक्रेन युद्धविरामात युरोपीय आयोगाची आडकाठी; डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगणार?

EU on Trump Putin Alaska Summit : अमेरिकेतील अलास्का येथे काल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Trump Putin Alaska Summit) यांच्यातील बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्याच्या उद्देशाने ही बैठक होती परंतु, या बैठकीत कोणताही (Alaska Summit) निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणार आहे. यातच आता युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी मोठे विधान करत युरोपियन देशांची भूमिका स्पष्ट केली आहे. सुरक्षिततेची हमी फक्त युक्रेनच नाही तर युरोपच्या सुरक्षा गरजांची संरक्षण झाले पाहिजे. यात कोणतीही तडजोड नको असे त्यांनी सांगितले.


या बैठकीनंतर उर्सुला यांनी ट्विट केले. युरोप, अमेरिका आणि युक्रेन मिळून एक न्यायपूर्ण आणि स्थायी शांततेसाठी काम करत आहेत. सुरक्षितेतची हमी मिळाली पाहिजे. यात फक्त युक्रेनच नाही तर संपूर्ण युरोपाच्या सुरक्षा गरजा देखील पूर्ण झाल्या पाहिजेत. ही अट अत्यंत बंधनकारक आहे असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले. यातून स्पष्ट होते की युरोपीय संघ कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या दबावाला बळी पडणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये तब्बल तीन तास बैठक, भारताची दिली पहिली प्रतिक्रिया

युरोपीय देशांची संयुक्त आघाडी

सूत्रांनुसार या घडामोडींवर युरोपीय देशांकडून (European Countries) एक संयुक्त निवेदन सादर केले जाणार आहे. यात रशियाबरोबर शांतता चर्चेसाठी काही अटी ठेवल्या जातील. युक्रेनची सुरक्षितता आणि संप्रभुतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे युरोपने आधीच स्पष्ट केले आहे. म्हणजेच आता आगामी काळात ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील डीलच्या तुलनेत युरोपीय देशांच्या अटी जास्त महत्वाच्या ठरणार आहेत.

या बैठकीची जगभरात चर्चा झाली असली तरी यातून ठोस तोडगा निघणे आता कठीण दिसू लागले आहे. युरोप आणि युक्रेनच्या कठोर अटी पाहता ठोस तोडगा काढणे पुतिन यांच्यासाठीही कठीण होणार आहे. उर्सुला वॉन डेर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे की युक्रेनच्या सुरक्षेची पक्की हमी मिळाल्यानंतर शांतता चर्चा पुढे जाऊ शकेल.

ट्रम्प-पुतिन बैठकीवर भारताची प्रतिक्रिया

भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीचं स्वागत केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपण्याची जग वाट पाहात (Ukraine) असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. युक्रेनमधील आमच्या मित्रांना शांती, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्याच्या शुभेच्छा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आपल्या संदेशात म्हटलं आहे.

पुतिन यांच्या अटी अन् ट्रम्प यांची बोलती बंद, बैठक निष्फळ; रशिया-युक्रेन युद्धाचा ‘फुलस्टॉप’ हुकला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube