पुतिन यांच्या अटी अन् ट्रम्प यांची बोलती बंद, बैठक निष्फळ; रशिया-युक्रेन युद्धाचा ‘फुलस्टॉप’ हुकला

पुतिन यांच्या अटी अन् ट्रम्प यांची बोलती बंद, बैठक निष्फळ; रशिया-युक्रेन युद्धाचा ‘फुलस्टॉप’ हुकला

Trump Putin Talks Alaska Summit : अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन (Donald Trump Putin Talks) यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. या बैठकीत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर काहीतरी तोडगा निघेल, युद्धविराम (Russia Ukraine War) तरी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणार आहे. या बैठकीची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. दोन्ही नेत्यांनी बैठक फलदायी आणि परस्पर सन्मानजनक होती असे सांगितले.

दरम्यान, या बैठकीच्या आधी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी इशारा दिला होता की युक्रेनशिवाय यु्क्रेनच्या (Ukraine Crisis) बाबतीत कोणताच निर्णय घेतला जाऊ शकत नाही. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की पुढील बैठकीत कदाचित झेलेन्स्की देखील सहभागी होऊ शकतात. परंतु, याबातीत अद्याप स्पष्टता नाही.

डोनाल्ड ट्रम्प सरकारचा खतरनाक प्लॅन; 3 लाख सरकारी नोकऱ्यांवर गदा; कर्मचाऱ्यांत खळबळ!

या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प म्हणाले जोपर्यंत पूर्ण डील होत नाही तोपर्यंत कोणतीच डील होणार नाही. काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे परंतु, काही मुद्दे अजूनही शिल्लक राहिले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देखील बैठक उपयुक्त होती असे सांगितले. रशिया अगदी प्रामाणिकपणे युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, आमच्या ज्या काही काळजीच्या गोष्टी आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजेत असे पुतिन म्हणाले.

रशियाच्या अटी अन् युक्रेनची भूमिका

युक्रेनने नाटोत सहभागी होण्याची इच्छा सोडून द्यावी असे रशियाने अनेक वेळा म्हटले आहे. युक्रेनने पूर्वेकडील क्षेत्र रशियाला देऊन टाकावे अशीही रशियाची मागणी आहे. खरंतर हा भाग रशियाने आधीच ताब्यात घेतला आहे. युक्रेनने मात्र या मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे. कोणत्याही शांतता करारात आम्हाला सुरक्षिततेची हमी मिळावी असे यु्क्रेनने स्पष्ट केले आहे.

बैठकीत नेमकं काय घडलं

दोन्ही नेत्यांत जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. याचे कारण म्हणजे बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी फक्त 12 मिनिटे मीडियाशी संवाद साधला. यातही पत्रकारांतूनही त्यांनी कोणताच प्रश्न घेतला नाही. बैठक सकारात्मक राहिली इतकेच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. पुतिन म्हणाले, युद्ध समाप्त करण्यासाठी मूळ समस्येचा अंत करण्याची गरज आहे. ज्यावेळी युद्ध सुरू झालं त्यावेळी जर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती असते तर कदाचित युद्ध झालंच नसतं असे पुतिन यांनी सांगितले.

“युद्ध थांबलं नाही तर रशियाला परिणाम भोगावे लागतील”, पुतिन यांना भेटण्याआधीच ट्रम्प यांची खुली धमकी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube