Radhakrishna Vikhe : संजय राऊत म्हणजे भरकटलेला पुढारी, मंत्री विखेंचे टीकास्त्र
Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. विखे पाटील नेमकं करतायेत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणजे भरकटलेला पुढारी, अशा शब्दात त्यांना राऊतांवर निशाणा साधला.
शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध दमदार शतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
आज मंत्री विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. त्यांना राऊतांना केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, मी काय करतो, ते नगर जिल्ह्यातील जनता जाणते. तुम्ही जे बेताल वक्तव्य करता, त्यामुळं तुमच्या पक्षाचंही वाटोळं झालं आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून ते कोणत्याही विषयाचं भांडवलं करतात. राऊत हे एक भरकटलेला पुढारी आहेत0. शिवसेनेने त्यांना का प्रवक्ते पदावरती ठेवलंय, माहिती नाही. वस्तुस्थिती काय आहे? राहुरीची घटना कशामुळे घडली याचं काही तारतम्यच बाळगलं नाहीतर विनाकारण पोलीस यंत्रणा बदनाम होते. तुम्ही जे बेताल वक्तव्य करतात, त्यामुळे पक्षाचा देखील वाटोळं झालं आहे. पक्ष नेतृत्वाचा देखील तुम्ही निकाल लावला आहे आणि आता उरले-सुरले जे लोक राहिले आहेत, त्यांचाही निकाल लावण्याच्या तुम्ही तयारीत आहात, असं टीका विखेंनी केली.
अख्खी इंडस्ट्री पूनमच्या विरोधात असताना दिग्दर्शकाने दिला पाठिंबा, अन् स्वत:च झाला ट्रोल
धनगर समाज मराठा समाज आरक्षण वाद
राज्यात सध्या मराठा समाज व ओबीसी समाजात आरक्षणावरून लढाई सुरू आहे. सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या. त्याला मंत्री छगन भुजबळांनी जोरदार विरोध केला. त्यावरून जरांगे व भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत. यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे म्हणाले, त्या आंदोलनाच्या बाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणात धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. ती भूमिका सरकारने अद्याप बदललेली नाही. यामुळे ओबीसी बांधवांना देखील माझी विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारची आहे. माझं देखील ओबीसी समाज आणि जरांगे पाटलांना आवाहन आहे की, राज्यात ताणतणाव निर्माण करण्यापेक्षा शांततेचा मार्ग अवलंबला पाहिजे, असंही मंत्री विखे म्हणाले.