शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध दमदार शतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध दमदार शतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

IND vs ENG : शुभमन गिलने (Shubman Gill) विशाखापट्टणम कसोटीत (IND vs ENG) दमदार शतक ठोकले. शुभमनने 131 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर तो शोएब बशीरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण आऊट होण्यापूर्वी त्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले होते. सध्या भारतीय संघाची धावसंख्या 8 विकेटवर 230 धावा आहे. अक्षर पटेलने (Akshar Patel) 45 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. भारतीय संघाकडे 374 धावांची आघाडी आहे.

या शतकासोबत शुभमन गिलने त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. शुभमनने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. याशिवाय या त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये 4 अर्धशतके झळकावली आहेत.

अख्खी इंडस्ट्री पूनमच्या विरोधात असताना दिग्दर्शकाने दिला पाठिंबा, अन् स्वत:च झाला ट्रोल

विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाची पकड मजबूत होत आहे. भारताची दुसऱ्या डावात 8 बाद 230 धावा आहेत. सध्या भारताकडून रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह क्रीजवर आहेत. टीम इंडियाची आघाडी 374 धावांपर्यंत पोहोचली आहे. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात 209 धावांची उत्कृष्ट खेळी केली.

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाचा ग्रीन ड्रेसमध्ये ग्लॅम लूक; चाहते घायाळ

याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 396 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने 209 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 253 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाला 143 धावांची आघाडी मिळाली. त्याचबरोबर आता भारतीय संघाची आघाडी 374 धावांवर पोहोचली आहे. सध्या भारताकडून रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह क्रीजवर आहेत.

1 पॅनवर 1000 अकाउंट… ओळखपत्राविना करोडो रुपयांचे व्यवहार, अशा प्रकारे पेटीएम आले आरबीआयच्या रडारवर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज