1 पॅनवर 1000 अकाउंट… ओळखपत्राविना करोडो रुपयांचे व्यवहार, अशा प्रकारे पेटीएम आले आरबीआयच्या रडारवर

1 पॅनवर 1000 अकाउंट… ओळखपत्राविना करोडो रुपयांचे व्यवहार, अशा प्रकारे पेटीएम आले आरबीआयच्या रडारवर

Paytm Crisis: पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Crisis) आरबीआयने 31 जानेवारीला निर्बंधाची घोषणा केली. यामुळे फास्टॅग, वॉलेट आणि बँक खात्यात (Paytm Banking Service) पैसे जमा करण्यावरही बंदी असणार आहे. आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, पेटीएम बँकिंगमध्ये 29 फेब्रुवारीनंतर कोणतेही व्यवहार करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने पेटीएमवर बंदी घातली, परंतु पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर कशी आली हे तुम्हाला माहिती आहे का?

पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य ओळखपत्रांची पडताळणी न करता करोडो खाती उघडली, या खात्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एवढेच नाही तर ओळखपत्राविना कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही केले होते, त्यामुळे मनी लाँड्रिंगची भीती निर्माण झाली होती.

1 पॅन कार्डवर 1000 बँक खाती
रॉयटर्सच्या अहवालानुसार, आरबीआयने बंदी लादण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये एका पॅन खात्यावर 1,000 हून अधिक वापरकर्त्यांचे खाते जोडलेले होते. शिवाय, RBI आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले.

यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार? …

पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी होणार
महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, निधीचा गैरवापर केल्याचा पुरावा आढळल्यास ईडी पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करेल. दरम्यान, पेटीएमने स्पष्ट केले की कंपनी आणि One97 कम्युनिकेशनचे सीईओ विजय शेखर शर्मा हे मनी लाँड्रिंगच्या ईडी चौकशीत नाहीत. काही व्यापाऱ्यांच्या चौकशीचा विषय असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बाबतीत बँक पूर्ण सहकार्य करत आहे.

पेटीएमच्या डेली ट्रेडिंगवर लिमिट
भारतातील स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमच्या शेअर्ससाठी डेली ट्रेडिंग लिमिट 10% पर्यंत कमी केली आहे. गेल्या दोन दिवसांत कंपनीचे शेअर 40 टक्क्यांनी घसरले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

Shahid Kapoor : शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

पेमेंट्स बँकेत 31 कोटी निष्क्रिय खाती
पेटीएम पेमेंट्स बँकेकडे सुमारे 35 कोटी ई-वॉलेट आहेत. त्यापैकी सुमारे 31 कोटी सक्रिय नाहीत, तर केवळ 4 कोटी रक्कम नसताना किंवा फारच कमी रकमेसह चालू आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात निष्क्रिय खाती आहेत. तर लाखो खात्यांमध्ये केवायसी अपडेट केलेले नाही.

Urmila Matondkar: ‘त्या’ एका चुकीमुळं लागला अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या करिअरला ब्रेक!

2 अब्ज डॉलर्सचे नुकसान
RBI च्या निर्देशानंतर, Paytm ब्रँडची मालकी असलेल्या One97 Communications Limited चे शेअर्स गेल्या दोन दिवसात 40 टक्क्यांनी घसरले आहेत. शुक्रवारी बीएसईवर शेअर 20 टक्क्यांनी घसरून 487.05 रुपयांवर आला. दोन दिवसांत कंपनीचे मार्केट कॅप 17,378.41 कोटी रुपयांनी घसरून 30,931.59 कोटी रुपयांवर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज