‘जो भ्रष्टाचारी भाजपसोबत तो पवित्र बनणार’; संजय राऊतांनी पुन्हा तोफ डागली

‘जो भ्रष्टाचारी भाजपसोबत तो पवित्र बनणार’; संजय राऊतांनी पुन्हा तोफ डागली

Sanjay Raut On BJP : जो भ्रष्टाचारी भाजपसोबत चालेल तो पवित्र बनला जाणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. महायुतीसोबत दुसऱ्या पक्षातील जे नेते गेले आहेत. ते भ्रष्ट नेत आता पवित्र बनले असल्याची अप्रत्यक्ष टीकाच संजय राऊत यांनी अजित पवारांसह इतर नेत्यांवर केली आहे. मुंबईत आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं अन् तुमचं घरं पेटवणारं; उद्धव ठाकरेंनी भाजपचं हिंदुत्वच काढलं

संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. अनेक नेत्यांनी त्यांनी जेलमध्ये पाठवलं होतं. आता त्यांची फाईल भेट नाही. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. छगन भुजबळ कोणत्या पक्षात जातील काय करतील? याबाबत मी बोलू शकत नाही पण छगन भुजबळ भाजपचा चेहरा बनू शकणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

Maximus Nagar Rising मॅरेथॉनसाठी अवघे 2 दिवस बाकी, नगरकरांसोबत छावा अन् काव्यांजलीचे कलाकारही धावणार

तसेच भुजबळ भाजपचा चेहरा बनू शकतात, असं जर म्हणणं असेल तर अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळीही त्यांचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचार हा बीजेपीचा चेहरा असूनजो भ्रष्टाचारी भाजपसोबत चालेल तो पवित्र बनला जाईल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

अहमदनगर महाकरंडकमधील एकांकिका पाहणे हा समृध्द करणारा अनुभव – बवेश जानवलेकर

‘वंचित’ महाविकास आघाडीचाच घटक पक्ष…
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे आज चर्चेला बसणार आहेत. कारण आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला आहे. वंचितचा हा समावेश अधिकृतपणे केला आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. आज आम्ही सर्व एकत्र बसणार आहोत. प्रकाश आंबेडकर स्वतः चर्चेत सहभागी होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही हद्दपार करण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची मदत आमच्या लढाईत फार महत्वाची असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अद्याप महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच आता आज वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर वंचित महाविकास आघाडीत असणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज