अहमदनगर महाकरंडकमधील एकांकिका पाहणे हा समृध्द करणारा अनुभव – बवेश जानवलेकर
Ahmednagar Mahakarandak : अहमदनगर महाकरंडक (Ahmednagar Mahakarandak ) या स्पर्धेतील एकांकिका पाहणे हा माझ्यासाठी समृध्द करणारा अनुभव होता. त्यामुळेच या स्पर्धेशी झी युवा वाहिनीच्या माध्यमातून जोडता आले याचा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया झी टॉकीज, झी युवा, आणि झी चित्रमंदिरचे मुख्य वाहिनी अधिकारी बवेश जानवलेकर (Bvesh Janvalekar) यांनी दिली.
‘आम्हाला आव्हानं देऊ नका अन्यथा..,’; जरांगेंचा भुजबळांना विनंतीवजा इशाराच
महाराष्ट्रातील हौशी रंगकर्मींचे लक्ष लागलेल्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेसाठी झी युवा वाहिनीचा पॉवर्ड बाय माध्यमातून महत्वाचा सहभाग होता. याबाबत आपली भूमिका मांडताना झी टॉकीज, झी युवा, आणि झी चित्रमंदिरचे मुख्य वाहिनी अधिकारी बवेश जानवलेकर म्हणाले, ‘कलाक्षेत्रात सतत काही ना काही नवं सुरू असते. हे क्षेत्र सृजनशील असल्याने नव्या कल्पना सिनेमा, नाटक, मालिका, लघुपट या माध्यमातून कधी रंगमंचावर तर कधी पडद्यावर येत असतात. कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि इतर असा प्रत्येक घटक कोणतीही कलाकृती प्रेक्षणीय बनवत असतो. अशा नव्या टॅलेंटच्या शोधात झी युवा, झी टॉकीज या वाहिन्या नेहमीच असतात.
RBI चा पेटिएमला दणका; 29 फेब्रुवारीनंतर वॉलेटमध्ये पैसे जमा करून घेण्यावर बंदी
यापूर्वीही अशा नव्या टॅलेंटचा शोध घेउन झी वाहिनीने कलाकारांना संधी दिली आहे. हा शोध निरंतर सुरूच असतो. मात्र अनेकदा आमच्यापर्यंत चांगले कलाकार, कलाकृती पोहोचत नाहीत, अशावेळी आम्हीच तिथपर्यंत जातो.अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा हा त्याचाच दुवा होता असे मला वाटते. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून असंख्य महाविद्यालयीन कलाकार त्यांच्या एकांकिकेसह उतरले होते. या स्पर्धेतील प्रत्येक एकांकिका पाहत असताना जाणवले की नाटकाच्या रंगमंचावर आणि पडद्यामागे कितीतरी हरहुन्नरी आणि कल्पक कलाकार आहेत. या स्पर्धेतील एकांकिका पाहणे हा माझ्यासाठी समृध्द करणारा अनुभव होता. त्यामुळेच या स्पर्धेशी झी युवा वाहिनीच्या माध्यमातून जोडता आले याचा आनंद आहे.”
Video : अनिल कपूरची पद्यामागाची गंमत, पाहा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या मेकिंगची झलक!
झी युवा ही वाहिनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देण्याबरोबरच या क्षेत्रातील नव्या टॅलेंटलाही तितकाच वाव देण्यासाठी पुढाकार घेत असते. चित्रपट असो किंवा रंगभूमी, या माध्यमातील नव्या दमाच्या कलाकारांसाठी झी युवा वाहिनीचे दालन नेहमीच खुले असते. विशेष म्हणजे कलाक्षेत्रातील युवा टॅलेंटला झी युवा वाहिनीने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. याची प्रचिती नुकतीच नाट्यप्रेमी व रसिकांना आली ती अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या मंचावर. ११ वर्षाची सातत्यपूर्ण परंपरा असलेल्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेसाठी झी युवा वाहिनीने पॉवर्ड बाय या माध्यमातून आपला सहभाग दिला. अहमदनगर महाकरंडक पॉवर्ड बाय झी युवा अंतिम फेरीत राज्यातून आलेल्या २५ एकांकिका सादर झाल्यात. त्यामुळे स्पर्धकांत निकालाची उत्सुकता होती.
सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल
रविवारी बक्षीस वितरण झाले. झी वाहिनीचे चिफ चॅनेल ऑफिसर , बवेश जानवलेकर , मराठी मूवी क्लस्टरत्यांच्या रोजच्या कामाच्या व्यापातुन वेळ काढून स्वत: अहमदनगरमध्ये उपस्थित होते. एवढेच नवे तर त्यांनी सर्व एकांकिका प्रेक्षकांमध्ये बसून पाहिल्या आणि त्याचा आनंदही घेतला.. त्याच बरोबर शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर महाकरंडक चे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, आमदार संग्राम जगताप, श्री महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी , स्वप्नील मुनोत, लेखक-दिग्दर्शक अभिजित दळवी यांच्याबरोबर या स्पर्धेला लाभलेले परीक्षक अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक संजय मोने, अभिनेते अतुल परचुरे, अभिनेत्री कृतिका तुळसकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला.
अहमदनगर महाकरंडक पॉवर्ड बाय झी युवा स्पर्धा १८ ते २१ जानेवारी या कालावधीत अहमदनगर येथे पार पडली. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अहमदनगर महाकरंडक पॉवर्ड बाय झी युवा एकांकिका स्पर्धा ही राज्यातील मोठी स्पर्धा आहे. महाविद्यालयीन जीवनात नाटकासारख्या माध्यमात पाउल टाकण्याचे व्यासपीठ ही स्पर्धा उदयोन्मुख कलाकारांना देते. अशा स्पर्धा, उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत कारण अशा स्पर्धांमधून मनोरंजन क्षेत्राला नवे दर्जेदार कलाकार मिळत असतात. सकस मनोरंजनासाठी हे उपक्रम आवश्यक आहेत.