अयोध्येत रामाचं राज्य पण महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य, संजय राऊतांचा नाशिकमधून हल्लाबोल
Sanjay Raut On Narendra Modi : प्रभु श्रीराम सत्यवचनी होते, एकवचनी होते पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. महाराष्ट्राची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अयोध्येत रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आलं, हे आपलं दुर्देव आहे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकच्या मेळाव्यातून केला.
2014 आणि 2019 साली नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी मोदींनी नाशिकला येऊन दोन्ही वेळेला सांगितलं होतं की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळून देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं त्यांच काय झालं? तेच मोदी काळाराम मंदिरात जाऊन झाडू मारताना देशाने पाहिलं. झाडू मारण्याचं काम तुमचं नाही, तुम्ही पंतप्रधान आहात. शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
देशानं पाहिलं मोदींनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. 11 दिवस उपास केले, मंदिरात ब्लॅकेटवर झोपले, पण देशातली 40 कोटी जनता रोजचं फुटपाथवर झोपते, त्यांच्याकडे लक्ष द्या. ढोंग कसली करता? मोदींनी म्हणे 11 दिवस उपवास केला. या देशातली 80 कोटी जनता अर्धपोटी आहे. उपवासाचे नाटक कसलं करता? ही नाटकं बंद करा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला? व्हायरल पत्राचं खरं इलेक्शन कमिशनने सांगितलं
राम मंदिर सोहळ्याचा आनंदाचा क्षण होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदीआनंद होता पण एकच माणूस या देशात रडला, नरेंद्र मोदी. आनंदाचा क्षण अन् रडताय काय? हा माणूस निवडणुका आल्या की रडतो. पुलवामामध्ये 40 जवानांची हत्या झाली तेव्हा यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
अहमदनगरच्या गोविंददेव गिरी महाराजांनी करवून घेतला PM मोदींकडून ’11 दिवसांचा’ उपवास…
गेल्या दीड वर्षात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या, पंतप्रधान महाराष्ट्रात आले पण त्यांच्या डोळ्यात पाणी आले नाही, रोज हजारो महिलांवर अत्याचार होत आहेत तेव्हा यांच्या डोळ्यात पाणी येत नाही. पण राजकारणात निवडणूक जवळ आली की एखाद्या प्रसंगात डोळ्यातून पाणी काढून डसाडसा रडतात. हे मगरीचे अश्रू आहेत, खोटे अश्रू आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
Budget 2024 : गरीबांना अच्छे दिन! कर संकलनातून मिळालेला पैसा ‘या’ योजनांवर होणार खर्च