लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला? व्हायरल पत्राचं खरं इलेक्शन कमिशनने सांगितलं

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला? व्हायरल पत्राचं खरं इलेक्शन कमिशनने सांगितलं

Loksabha Election : सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वार वाहु लागलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच सोशल मीडियावर केंद्रीय निवडणूक आयोगाचं (Election Commissioni) एक पत्र व्हायरल झालं. या पत्रामध्ये येत्या 16 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, या पत्राबाबत आता निवडणूक आयोगाकडून खरं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील ट्विट आयोगाकडून करण्यात आलं आहे. आता आयोगाच्या या ट्विटनंतर निवडणूकीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून तात्पुरते मतदारानाच दिवस 16 एप्रिला हा दिवस संदर्भासाठी दिला आहे. दिल्लीच्या एकूण 11 जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पत्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकाचं पालन करणं असं शीर्षक या पत्रात दिलं आहे. हे पत्र व्हायरल होताच निवडणूक आयोगाने ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.

शिर्डी लोकसभेसाठी चुरस वाढली… महाविकास आघाडीकडून आणखी एका पक्षाची दावेदारी

हे पत्र व्हायरल होताच सर्वत्रच निवडणूक 16 एप्रिलला होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या पत्रामध्ये फक्त संदर्भासाठीच तारीख दिली असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 16 एप्रिला 2024 हा मतदानाचा दिवस आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी @CeodelhiOffice च्या परिपत्रकाच्या संदर्भात मीडियाकडून काही प्रश्न येत आहेत. ईसीआयच्या निवडणूक आराखड्यानुसार अधिका-यांनी कामांची आखणी करण्यासाठी ही तारीख केवळ ‘संदर्भ’ म्हणून नमूद केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.” अशी पोस्ट निवडणूक आयोगाकडून शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसून एप्रिल किंवा मे महिन्यात आगामी लोकसभेसाठी मतदान होऊ शकते, असे बोललं जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिलपासून सुरू झाल्या आणि 19 मे रोजी संपल्या होत्या. 2019 सालच्या निवडणुका सात टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. त्यानंतर निकाल 23 मे रोजी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीची आणि निकालाची तारीख काय असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube