लोकसभेचा वचपा काढण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुनील तटकरे उद्या नगरच्या दौऱ्यावर
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकाची (Assembly elections) तयारी सुरू केली. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली. तटकरे हे उद्या नगर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांचा आढावा ते घेणार आहे.
Air India च्या फ्लाईटमध्ये तुम्ही पण जेवण मागवताय? तर सावधान…मिलमध्ये आढळलं धारदार ‘ब्लेड’
लोकसभेत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने नगर जिल्ह्यामध्ये पक्षाचा वर्धापन दिन दिन सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला. स्थापना दिनाच्या माध्यमातून एकीकडे विधानसभा निवडणुकीचे देखील रणशिंग या मंचावरून त्यांनी फुंकले. अहमदनगर जिल्ह्यात नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले, तर या ठिकाणी महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी भविष्यात स्वबळावरती लढण्याच्या चाचपणीच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
Khatro ke Khiladi मध्ये दुखापत; कृष्णा श्रॉफने तरीही खंबीरपणे केला खास स्टंट
यातच विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी तटकरेंनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. उद्या तटकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून या बाराही मतदारसंघांचा आढावा तटकरे हे घेणार आहेत. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. पदाधिकाऱ्यांची बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधणारा असून यावेळी नेमकं ते काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
नगर जिल्ह्यात तुल्यबळ
नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता या ठिकाणी आता दोन्ही गटाकडे समसमान आमदारांची संख्या आहे. राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी अजित पवार गटाकडे तीन व शरद पवार गटाकडे तीन असे आमदार आहेत. संग्राम जगताप, किरण लहामटे आणि आशुतोष काळे हे अजित पवार गटात आहेत, तर रोहित पवार, प्राजक्ता तनपुरे व माजी आमदार तसेच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे शरद पवार गटात आहेत. आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपली ताकद दाखवत अजित पवार गटाला मोठे चॅलेंज दिले आहे.