अयोध्येचा अध्याय बदलला; राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास ‘NCERT’वर संतापले

अयोध्येचा अध्याय बदलला; राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास ‘NCERT’वर संतापले

NCERT 12 Syllabus : इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT)कडून हे बदल करण्यात येतात. (12 Syllabus) यामध्ये अयोध्या आंदोलन आणि गुजरात दंगलीशी संबंधित महत्त्वाच्या घटनांच्या तपशिलाबाबत पुस्तकात बदल करण्यात आले आहेत. यावर विरोधक टीका करत आहेत. त्यावर काल (NCERT)प्रमुख दिनेश सकलानी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, यावर आता अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास महाराज यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

तीन घुमटाची रचना

सत्येंद्र दास महाराज म्हणाले, अभ्यासक्रमात केलेल्या बदलावर आपण समाधानी नाहीत. बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात एनसीईआरटीच्या नवीन पाठ्यपुस्तकात काही उणिवा आहेत. पुस्तकात 6 डिसेंबर 1992 रोजी तीन घुमटाची रचना कशी हटवण्यात आली याचा उल्लेख नाही. पुस्तकात ते 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्येचा निकाल दिल्यानंतरच माहिती देण्यात आली आहे असं ते म्हणाले आहेत.

अभ्यासक्रमाचे भगवेकरण

त्याचबरोबर महाराज पुढे म्हणाले, ‘या पुस्तकात 6 डिसेंबर 1992 च्या घटनांचा तपशील नाही, जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली. 22 डिसेंबर 1949 रोजी मशिदीच्या आवारात प्रभू राम लल्ला यांची मूर्ती कधी प्रकट झाली याचाही उल्लेख पुस्तकात नाही. यावरून अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोप होत असताना ते आरोप (NCERT)चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी फेटाळून लावले आहेत. दंगली शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये का शिकवल्या पाहिजेत?, असा प्रतिप्रश्नही सकलानी यांनी उपस्थित केला आहे.

चार पानांवरून दोन पानांवर

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अनेक मोठे बदल केले आहेत. यामध्ये बाबरी मशीद हा शब्द काढून टाकण्यात आला आहे, त्याऐवजी तीन घुमट वास्तू असं वर्णन करण्यात आलं आहे. याशिवाय अयोध्येचा अध्याय चार पानांवरून दोन पानांचा करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज