MSBTE New Syllabus : नवा अभ्यासक्रम देणार विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकण्याची संधी!
MSBTE New Syllabus : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ( MSBTE New Syllabus ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नवा अभ्यासक्रम आणला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची हमी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचं नाव ‘K Scheme’ असं आहे.
आमदार धंगेकर आणि रासनेंमध्ये ‘बॅनरवॉर’, धंगेकरांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधान
या अभ्यासक्रमामध्ये NEP-2020 मधील तरतूदींनुसार एकूण ४९ अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नविन बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
“मला दोन पक्षांच्या ऑफर, राज ठाकरेंचाही फोन आला होता”, पण… वसंत मोरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ नेहमीच बदलत्या काळानुरूप आणि व्यवसायाला अनुकूल ठरेल असे बदल किंवा सुधारणा अभ्यासक्रमात सतत करित असते. त्यातत जून २०२३ पासून K Scheme या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर डिसेंबर २०२५ पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या अभ्यासक्रमाची अंबलबजावणी पूर्ण होणार आहे.
Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत. कोणती आहेत ही वैशिष्ट्ये पाहुयात… महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हा नवा अभ्यासक्रम इंग्रजीसह मराठी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मराठी- English (द्विभाषिक) किंवा हिंदी- English (द्विभाषिक) भाषेत परीक्षा देऊ शकतील.
मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार
या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानप्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यामध्ये विद्यार्थ्याच्या प्रत्येक वर्षाच्या शिक्षणाचे महत्त्व कायम ठेवून त्याला शिक्षण कोणत्याही वर्षाला थांबवण्याची आणि पुन्हा सुरू करण्याची परवानगी असणार आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अपूर्ण राहणार नाही. प्रत्येक शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. एखादा विद्यार्थी पदविका शिक्षण अर्धवट सोडून गेल्यास तो पुन्हा परत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहे. ही तरतूद विद्यार्थ्याचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी नवसंजीवनी ठरणार आहे.
श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत; गोडसेंच्या नावाला भाजपकडून ‘रेड मार्क’
औद्यागिक प्रशिक्षणाचा कालावधी ६ आठवड्यांवरून १२ आठवडे केला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्राचे क्रेडिट मिळणार आहेत. स्वयं अध्ययनाचा विचार करून Self Learning Assessment ची तरतूद करण्यात आली आहे. बदलत्या जीवनशैलीचा विचार करून विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य जपण्यासाठी योगासन आणि मेडिटेशनचा नियमित सराव अनिवार्य करण्यात आला आहे.
लोकशाहीची मुल्ये रुजवण्यासाठी भारतीय संविधानावर आधारित ‘Essence of Indian Constitution’ या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक साक्षरता या बाबींचा देखील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एक सक्षम आणि अष्टपैलू अभियंता घडवण्यासाठी हा अभ्यासक्रम नक्कीच उपयुक्त आहे. तरी दहावी आणि बारावीनंतर पदविका तंत्रशिक्षण हा एक उत्तम पर्याय असू शकतो याचा विद्यार्थी आणि पालकांनी नक्कीच विचार करावा. असं आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा www.msbte.org.in किंवा www.dte.maharashtra.gov.in