Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi Criticized Modi Government : अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली हे मी तुम्हाला दाखवून देईन. अग्निवीर कशासाठी सुरू करण्यात आले याची माहिती सेनेच्या प्रमुखांना सुद्धा नव्हती. याआधी जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत मिळत होती. परंतु, अग्निवीर शहीद झाल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही. अदानी डिफेन्सला फायदा मिळावा म्हणून सरकारने अग्निवीर लागू केले, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. भारत जोडो न्याय यात्रा घेऊन आज राहुल गांधी महाराष्ट्रातील धुळे नंदूरबार येथे आले आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चौकसभेत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.
Rahul Gandhi : ‘इलेक्टोरल बाँड’ भाजपाच्या भ्रष्ट धोरणांचा पुरावा’; राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी पुढे म्हणाले, त्यावेळच्या सेनाप्रमुखांना या योजनेची माहिती सुद्धा देण्यात आली नाही. आता मोदींनी दोन प्रकारचे शहीद केले आहेत. एकाला पेन्शन आणि सर्व मदत मिळेल परंतु, दुसऱ्या प्रकारच्या शहीदाला पेन्शन नाही, आदरही मिळणार नाही. शहीदाचा दर्जाही मिळणार नाही ते आहे अग्निवीर. चीनच्या सैनिकांना तीन ते चार वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं. परंतु, आपल्या अग्निवीरांना फक्त सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. काय होणार, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदींची इच्छा आहे की हा पेन्शनचा जो पैसा आहे तो सरळ अदानी डिफेन्सला मिळावा. अदानींनी हत्यारे खरेदी करावीत. पुढे अदानी काय करणार तर अमेरिका आणि इस्त्रायलच्या कंपनीबरोबर भागीदारी करणार. त्यानंतर या कंपन्यांनी तयार केलेली शस्त्रात्रे अदानी येथे आणून विकणार. त्यामुळे जवानांचे प्रशिक्षण, पेन्शन आणि त्यांच्या देखभालीसाठी जे पैसे खर्च केले जाणार होते ते सगळे अदानीच्या खिशात टाकण्याचा सरकारचा हेतू आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
दॅट चॅप्टर इज ओव्हर; राहुल गांधी अन् वरिष्ठांचे नाव घेताच अशोक चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया
सध्या दिल्लीतलं सरकार फक्त 90 माणसं चालवत आहेत. हे कोण तर अधिकारी आहेत. यात आपले लोकं किती. बजेट देखील हेच सादर करतात. त्यात शंभर रुपये दाखवतात त्यात फक्त सहा रुपये खर्च करतात. जीएसटी कोण भरतं तर त्याचाही फायदा अदानीला मिळतो. आता तर सगळंच अदाणीला देत आहेत. देशातील युवक मात्र तासनतास मोबाइलमध्ये गुंतलेले असतात. तुम्ही मोबाईल तासतास बघता तुमचं लक्ष तिकडे वळवलं जातं आणि रोजगारात मारलं जातं. महागाई, बेरोजगारी आणि भागीदारी हे तीन मुद्दे देशात आहेत. मी अनेकांना विचारलं. मीडिया तुमचा नाहीच. तो तुमचे प्रश्न कधीच दाखवणार नाही. तुमची मीडियात काहीच भागीदारी नाही. देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांत वंचित घटकांतील एकही नाही, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी सरकारवर केली.