दॅट चॅप्टर इज ओव्हर; राहुल गांधी अन् वरिष्ठांचे नाव घेताच अशोक चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया

  • Written By: Published:
दॅट चॅप्टर इज ओव्हर; राहुल गांधी अन् वरिष्ठांचे नाव घेताच अशोक चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेसला राम राम करणाऱ्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) मी भाजपमध्ये आज (दि.13) जाहीर प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसमध्येच थांबावे यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केला का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले की, अब छोडीये जो हो गय सो हो गया दॅट चॅप्टर इज ओव्हर असे उत्तर दिले. त्यांची ही प्रतिक्रिया अतिशय इन्शटंट आणि बोलकी होती. आता नवी सुरूवात असून, दुपारी बारा ते साडेबारादरम्यान भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे चव्हाणांनी सांगितले. (Ashok Chavan On Rahul Gandhi & Congress Senior Leaders )

चव्हाणांच्या राजीनाम्याची मुहूर्तमेढ आठ महिन्यांपूर्वीच रोवली होती! शरद पवारांच्या नेत्याचा बडा दावा

चव्हाण म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करताना तुमच्यासोबत अन्य नेते असणार का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मी कुणालाही आमंत्रण दिलेले नाही. आजपासून मी राजकीय आयुष्याची पुनःश्च एकदा नव्याने सुरूवात करत आहे. दुपारी बारा ते साडेबारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये रितसर प्रवेश करणार आहे. यावेळी चव्हाणांनी जो हो गया सो हो गया म्हणत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह राहुल गांधी आणि सोनिया गांधीनीही थांबवण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

मराठवाड्यातील हुकूमी एक्का, मोदी लाटेतही ‘विजयी’; चव्हाणांच्या ‘पॉलिटिक्स’ची BJP लाही गरज

अशोक चव्हाणांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक अगदी जवळ आलेल्या असतानाच ही घडामोड घडल्याने आघाडीला आता नव्याने राजकीय गणितांची मांडणी करावी लागणार आहे. फक्त अशोक चव्हाणच नाही तर, त्यांच्याबरोबर अमर राजूरकर हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी

चव्हाणांसोबत कोण कोण?

काँग्रेस पक्षाच्या सदसत्वाचा आणि आमदारकीच्या राजीनाम्यानंतर चव्हाणांसोबत असणाऱ्या काही काही नेत्यांची नावे समोर आली आहे. यात मुंबईतील दोन नावे असून, अमीन पटेल, अस्लम शेख, सुलभा खोडके, विश्वजीत कदम, माधव जवळकर, जितेश अंतापूरकर, अमित झनक, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर हेदेखील चव्हाणांची साथ देत राजीनाम देणार असल्याचे सांगितले जात आहे. वरील नावांशिवाय माजी मंत्री डी.पी. सावंत आणि माजी खासदार खतगावर हेदेखील चव्हाणांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे, अजितदादांमुळे मला मतदार संघचं उरला नाही; पंकजा मुंडेंनी आळवला नाराजीचा सूर

चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे रघुराम राजन यांची खासदारकी धोक्यात

देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून 2018 साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत दोन एप्रिल रोजी संपत आहे. यात नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे. चव्हाण यांच्या या राजकीय खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांची खासदारकासाठीची उमेदवारी धोक्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube