श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत; गोडसेंच्या नावाला भाजपकडून ‘रेड मार्क’

  • Written By: Published:
श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत; गोडसेंच्या नावाला भाजपकडून ‘रेड मार्क’

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल (दि.12) नाशिकमध्ये आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीत मीठाचा खडा पडला आहे. गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता भाजपातील नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली असून, उमेदवारी जाहीर करण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) ऑथेरिटी नसून, दिल्लीचे नेतृत्त्वच उमेदवारांची नावं ठरवले असे भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे. दरेकरांच्या या विधानानंतर गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित

महायुतीचे अद्याप जागावाटप झालेले नसून कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जागा मिळणार याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, त्या आधीच नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर करून टाकले. त्यांच्या या घोषणेनंतर आता भाजप नेत्यांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरूवात केली आहे.

‘वंचित’च्या तक्रारी आम्ही सोडवणार; चर्चा फिस्कटल्यानंतर शरद पवारांचा आंबेडकरांना शब्द

उमेदवार जाहीर करण्यासाठी श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. दिल्लीचे नेतृत्वच उमेदवारांची नावे जाहीर करेल. एकवेळ एकनाथ शिंदे यांनी नाव जाहीर केलं असत, तर यावर बोलणं उचित ठरले असते अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे. तिन्ही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल. कुठेही विसंवाद होणार नाही. ज्या जागा त्यांना वाटतात, त्या जागा ते मागतायत. ज्या जागा योग्य असतील त्या त्यांना मिळतील असेही दरेकरांनी यावेळी सांगितले.

शांतिगिरी महाराजही निवडणुकीचा रिंगणात उतरणार, थेट मुख्यमंत्र्यांना तिकीट मागितले

जागा वाटपात ही जागा शिवसेनेला जाणार आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवार जाहीर करून टाकली. या मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मला बिनविरोध निवडून द्यावे, असे इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

शांतिगिरी महाराज यांचा नाशिक जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे. तसेच जिल्ह्यातही त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे तेही निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. तसेच त्यांनी लोकसभा मतदारसंघात दौरेही सुरू केलेले आहेत. ते नागरिकांनी भेटत आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे यांचा शिवसेनेकडून पत्ता कट होईल व शांतिगिरी महाराज यांना तिकीट मिळेल, अशा चर्चा सुरू झाली होती. परंतु श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज