राऊत साहेब, औकात काढू नका सरंपचाच्या निवडणुकीतही तुम्हाला..; CM शिंदेंवरील टीका दरेकरांना झोंबली

राऊत साहेब, औकात काढू नका सरंपचाच्या निवडणुकीतही तुम्हाला..; CM शिंदेंवरील टीका दरेकरांना झोंबली

Pravin Darekar : हिंदुहृदयसम्राट म्हणून एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आहेत हे लोकांनी मान्य केलं आहे. त्यांचा त्याग मोठा आहे. आता एकनाथ शिंदे जर हिंदुहृदयसम्राट असतील तर त्यांनी असं काय महान कार्य केलं ते आम्हाला पहावं लागेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राऊतांची लायकीच काढली आहे. तुम्हाला साध्या सरपंचपदाच्या निवडणुकीतही कुणी बोलवत नाही. त्यामुळे औकात वगैरे काढू नका, अशी टीका दरेकर यांनी केली.

संजय राऊत शिंदे साहेबांच्या (Eknath Shinde) शिवसेनेची चिंता करू नये. पक्षाचं नाव चिन्ह आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार शिंदे साहेबांना मिळालाय. मात्र तुमचं अस्तित्व संपतय त्याची आधी काळजी करा. शिंदे साहेबांनी हिंदुहृदयसम्राट लावलेलं नाही ते तिथल्या कार्यकर्त्यांनी लावलं आहे. त्यांच्या मनात बाळासाहेबच हिंदुहृदयसम्राट आहेत. परंतु, एक खरं आहे की हिंदुत्वाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली आहे ज्याला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने तिलांजली दिली.

Sanjay Raut : बावनकुळेंच्या मकाऊ दौऱ्यावर खुलासे करणाऱ्या दानवेंचं मन का खातंय? राऊतांचा टोला

महाराष्ट्रात शिंदे साहेबांची औकात काय हे दाखवून दिलंच आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले म्हणून आज सगळ्या राज्यांतून त्यांना मागणी आहे. राऊत साहेब साध्या सरपंचपदाच्या निवडणुकीतही तुम्हाला कुणी बोलवत नाही. त्यामुळे औकात वगैरे तुम्ही काही काढू नका. हे खरं आहे की आता तुम्हाला सावरकर आठवले आहेत. विधीमंडळात सावरकरांच्या ठरावासंदर्भात आपली भूमिका माहिती आहे. रस्त्यावर आपली भूमिका माहिती आहे. त्यानिमित्ताने सावरकर हिंदुहृदयसम्राट होते हे तरी मान्य केलंत अशा शब्दां दरेकर यांनी राऊतांवर टीका केली.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

आता एकनाथ शिंदे हिंदुहृदयसम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट म्हणून असं काय महान कार्य त्यांनी केलं आहे, ते आम्हाला पाहावे लागेल. आज इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरे सन्माननीय हिंदुहृदयसम्राट यांच्याबरोबर काम केले त्यांचा संघर्ष पहिला. हिंदुत्वासाठी त्यांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत. बेइमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची नवीन परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर हे पहावं लागेल. हिंदुहृदयसम्राट म्हणून एक स्वातंत्र्यवीर सावरकर व दुसरे बाळासाहेब ठाकरे हे लोकांनी मानले आहेत. त्यांचा त्याग मोठा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube