मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार

  • Written By: Published:
मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार

पुणे : अजितदादांविरोधात विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभेला अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, शिवतारेंच्या या निर्णयामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (vijay Shivtare Will Be An Independent Candidate For Baramati LokSabha)

श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत; गोडसेंच्या नावाला भाजपकडून ‘रेड मार्क’

शिवतारे म्हणाले की, माझ्याविरोधात अजित पवारांनी (Ajit Pawar) खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. त्यानंतर पुरंदरच्या लोकांची आम्हाला बदला घ्यायचा आहे अशी भावना असल्याचे शिवतारेंनी सांगितले. एवढेच नव्हे तर, शेतकरी फोन करून सांगतात बापू माघार घेऊ नका असे सांगत आहे. आज सुळे आणि सुनेत्रा पवारांना लोक मत देऊ इच्छित नसल्याचेही शिवतारे म्हणाले. जनता सुज्ञ झालेली असून पार्थ पवारांना मावळच्या सामान्य जनतेनं पाडल्याचे म्हणत भोर, दौंड, इंदापूरला काय दिलं ते सांगा असा सवालही यावेळी शिवतारेंनी उपस्थित केला.

मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार

हे बंड नाही तर, न्यायाची लढाई

लोकसभेसाठीची मैदानात उरतून लढाई लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण हे बंड नसल्याचे शिवतारेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच हे शिवसेनेचे बंड नसून ही न्यायाची लढाई आहे. मी महायुतीच्या विरोधातही नाही. यापूर्वीदेखील विरोधात कुणी ना कुणी असायचे. यात एका बाजूला पवार तर, दुसऱ्या बाजूला कधी कांचन कुल तरस कधी नलावडे होत्या. पण आज पवार विरूद्ध पवार आहेत. मग या 5 लाख 80 हजार मतदारांनी जायचं कुठे असा प्रश्न शिवतारेंनी यावेळी विचारला. या सर्वांना न्याय देण्यासाठीच मी ही लोकशाहीची लढाई लढत आहे. लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून हे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयबापू शिवतारेंना सतत दमात घेणारे ‘अजितदादा’ आता शांत का?

पवारांच्या विरोधात पाच लाखांहून अधिक मतदार

शिवतारे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून येतात. शिवसेना-भाजपा- राष्ट्रवादीमध्ये सध्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते आपलाच दावा असल्याचे सांगत आहेत. विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय घेणार नाही असे म्हणत शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असल्याचा दावा शिवतारेंनी केला आहे. या दाव्यामुळे अजित पवारांची धाकधूक काहीशी वाढल्याचे बोलले जात असतानाच आता शिवतारेंनी बारामती लोकसभेसाठी अपक्ष मैदानात उतरणार असल्याची घोषणाचं केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज