Sachin Ahir: विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांच्या वाट्याचं पद

Sachin Ahir: विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांच्या वाट्याचं पद

पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांना जिल्हा नियोजन समितीचे (District Planning Committee) तज्ज्ञ सदस्य असे पद देण्यात आले आहे. यावरुन बोलताना ठाकरे गटातील नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवतारेंना टोला लगावला.

पुणे (Pune) जिल्ह्यात पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना निरा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवतारेंवर तोंडसुख घेतले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे शिवसेनेत असताना मोठे नेते म्हणून वावरत होते. मात्र एकेकाळी साधा कार्यकर्ता किंवा पीएला त्यांनी जी पदं दिली.

आज त्या पदावर त्यांना समाधान मानावं लागत आहे” अशी खरमरीत टीका आमदार सचिन अहिर यांनी केली आहे.

हा एक प्रकारे पुरंदरच्या जनतेचा हा अपमान आहे, शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रिपदाच्या समतुल्य महामंडळ मिळायला पाहिजे होते, पण तसं काहीच झालं नाही, असा खरमरीत टोला सचिन अहिर यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना लगावला आहे. .

विजय शिवतारे हे पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येत असत. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते.

त्यांनी साताऱ्याचे पालकमंत्रिपदही भूषवले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करुन शिंदे गटात प्रवेश केला.

“विजय शिवतारे, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते” अशा शब्दात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवतारे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवतारेंना पराभवाचा धक्का बसला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube