NCERT मध्ये नोकरीची संधी, 170 पदांसाठी भरती, 80 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Published:
NCERT मध्ये नोकरीची संधी, 170 पदांसाठी भरती, 80 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

NCERT Recruitment 2024 : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे फार कठीण काम आहे. मात्र, तुमचं तुम्हाला भाषेचं उत्तम ज्ञान असेल आणि तुम्ही डीटीपाच कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी उत्तर नोकरीची संधी चालून आली आहे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक(Assistant Editor), प्रूफ रीडर आणि DTP ऑपरेटर या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

OTT Release: रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ ओटीटीवर रिलीज होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 

पदांचा तपशील –
परिषदेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 60 सहाय्यक संपादकांची भरती केली जाणार आहे, त्यापैकी 25 इंग्रजी, 25 हिंदी आणि 10 उर्दू भाषा माध्यमांसाठी आहेत. त्याचप्रमाणे, NCERT 60 प्रूफ रीडर देखील भरती करेल, ज्यापैकी 25 इंग्रजी, 25 हिंदी आणि 10 उर्दू भाषांसाठी राखीव आहेत. तसचे डीटीपी ऑपरेटरच्या एकूण 50 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये इंग्रजीसाठी 20, हिंदीसाठी 20 आणि उर्दू भाषेसाठी 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते.

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक संपादक पदांसाठी, उमेदवारांना पुस्तक प्रकाशन किंवा जनसंपर्क किंवा पत्रकारिता या विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह पदवी आणि किमान 5 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

त्याचप्रमाणे, प्रूफ रीडर पदांसाठी, उमेदवारांना 1 वर्षाच्या अनुभवासह इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 42 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
तर डीटीपी ऑपरेटर पदांसाठी डीटीपीमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि किमान 3 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे.

Madhuri Dixit: गुलाबी साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज, चाहते फिदा 

अधिसूचना लिंक – https://ncert.nic.in/pdf/announcement/vacancies/projectstaffvacancy/PD_AE_PR_DTP-15-01.pdf

अर्ज प्रक्रिया-

सहाय्यक संपादक, प्रूफ रीडर आणि डीटीपी ऑपरेटर या पदासाठी उमेदवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत थेट नवी दिल्लीतील NCERT कार्यालयात जाऊन नोंदणी करू शकतात. यानंतर 2 आणि 3 फेब्रुवारी 2024 रोजी होणा-या कौशल्य चाचणीला उपस्थित राहावे लागेल. प्रकाशन विभाग, NCERT, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110016 या पत्यावर उमेदवारांना हजर राहावे लागेल. उमेदवारांनी आपल्या सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत.

वेतन-

असिस्टंट एडिटर – 80 हजार रुपये प्रति महिना

प्रूफ रीडर- 27 हजार रुपये
डीटीपी ऑपरेटर – दरमहा 50 हजार रुपये

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज