राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
![राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/News-Photo-2025-02-12T113233.055_V_jpg--1280x720-4g.webp)
Satyendra Das Passed Away : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी लखनौ पीजीआयमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Satyendra Das ) आचार्य सत्येंद्र दास यांना 3 फेब्रुवारी रोजी स्ट्रोकनंतर गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कुणी हिंदूंचा नेता; मोहन भागवत यांचं मोठं विधान
आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सांगितले की, दीर्घ आजारानंतर सकाळी आठ च्या सुमारास लखनऊच्या पीजीआयमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पीजीआयमधून अयोध्येत आणले जात आहे. शिष्यांनी त्यांचे पार्थिव अयोध्येत नेले आहे. उद्या, 13 फेब्रुवारीला अयोध्येतील सरयू नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नुकतेच पीजीआयने एक हेल्थ बुलेटिन जारी केले होते ज्यात सत्येंद्र दास यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार असल्याचे म्हटले होते.
सत्येंद्र दास यांनी सुमारे 33 वर्ष राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी 1992 मध्ये ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर गेली तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना हटवण्याची चर्चा होती. दरम्यान, 1 मार्च 1992 रोजी भाजपचे खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि तत्कालीन विहिंप प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने सत्येंद्र दास यांची नियुक्ती करण्यात आली. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती.
परम रामभक्त, श्री राम जन्मभूमि मंदिर, श्री अयोध्या धाम के मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येन्द्र कुमार दास जी महाराज का निधन अत्यंत दुःखद एवं आध्यात्मिक जगत की अपूरणीय क्षति है। विनम्र श्रद्धांजलि!
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत पुण्यात्मा को अपने श्री चरणों में स्थान दे…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 12, 2025