दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचं निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
GN Saibaba Passed Away : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचं काल रात्री उशिरा निधन झालं. ते 57 वर्षांचा होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू होते. जीएन साईबाबा यांना 10 दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे NIMS मध्ये दाखल करण्यात आले होतं. रात्री 8 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली
माओवादी संबंधांच्या प्रकरणात अटक
जीएन साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मे 2014 रोजी माओवादी संबंधांच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ७ मार्च रोजी सुटका झाली. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठाने त्यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा बाजूला ठेवली आणि या खटल्यातील अन्य पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
खंडपीठाने सांगितलं की ते सर्व आरोपींना दोषमुक्त करत आहे. कारण फिर्यादी त्यांच्याविरूद्ध वाजवी संशयापलीकडे खटला सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला आहे. मार्च 2017 मध्ये, महाराष्ट्राच्या सत्र न्यायालयाने साईबाबा आणि महेश तिर्की, पांडू नरोटे, हेम मिश्रा, प्रशांत राही आणि विजय तिर्की यांच्यासह इतर पाच जणांना माओवादी संबंध आणि राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारल्यासारखे समजल्या जाणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सहभागासाठी दोषी ठरवलं.
कोण होते साईबाबा ?
जीए साईबाबा हे दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते 2003 मध्ये परत रुजू झाले होते. महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केल्यानंतर त्यांना 2014 मध्ये महाविद्यालयाने निलंबित केलं होतं.