धक्कादायक! युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात नेलं पण..

धक्कादायक! युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात नेलं पण..

 Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Nagpur) नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करणाऱ्या वकिलाचा युक्तिवाद चालू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला झाला आहे. यामुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Crime : सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

युक्तिवाद चालू होता

दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना वकील तलत इक्बाल कुरैशी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तेव्हा न्यायाधीश एस. बी. पवार यांनी त्यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. सातव्या मजल्यावर असलेल्या वरिष्ठ विभागीय दिवाणी न्यायाधीश एस. बी. पवार यांच्या न्यायालयात कुरैशी यांची उलटतपासणी झाली. आपली प्राथमिक उलटतपासणी पूर्ण केल्यानंतर कुरैशी यांनी कोर्टाला दाखले देऊन ते आपल्या बेंचवर बसले. यानंतर विरोधी पक्षाचे वकील आपली बाजू मांडत असताना कुरैशी अचानक बेंचवरून खाली कोसळले.

दोन विवाहित मुली

न्यायाधीश पवार ताबडतोब त्यांच्या जागेवरून खाली आले आणि त्यांना पाणी पाजलं. यानंतर न्यायाधीशांनी वेळ न दडवता वकील तलत कुरैशी यांना त्यांच्या खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलें. तलत कुरैशी यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तेव्हापासून ते एकटेच राहत होते. त्यांच्या पश्चात दोन्ही विवाहित मुली आहेत. या घटनेमुळे न्यायालयात शोककळा पसरली आहे.

नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात भाजपानेच अजितदादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

रुग्णवाहिकेची मागणी

जिल्हा न्यायालय संकुलात दररोज सुमारे आठ हजार वकील कामकाजासाठी येतात. तसंच न्यायालयीन कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. दररोज 30 ते 40 हजार नागरिक खटल्यांसाठी कोर्टात येतात. त्यामुळे कोर्टात रुग्णवाहिका व प्राथमिक उपचाराची सुविधा असावी. शासनाने येथे प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डीबीएचे माजी अध्यक्ष कमल सतुजा यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube