नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात भाजपानेच अजितदादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात भाजपानेच अजितदादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. अशात आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून होत आहे. निदान नेते मंडळी तरी तसं भासवत आहेत. पण, कार्यकर्ते काही ऐकायला तयार नाहीत. त्यांचा राग कधीतरी अनावर होतो आणि मग नेत्यांना काळे झेंडे दाखवण्याचे प्रकार घडतात. असाच प्रकार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबतीत घडला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवले. तसेच येथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले.

लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा…विखेंचा विरोधकांना खोचक टोला

पर्यटनासाठी जु्न्नर तालुक्याची खास ओळख आहे. तरी देखील सरकारी कार्यक्रमांत घटक पक्षांना डावललं जातं असा दावा भाजप नेत्या आशा बुचके यांनी केला. अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. पण त्यांनी जिल्ह्याच्या पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबद्दलही भाजप कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जनसन्मान यात्रेवेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत आपला संताप व्यक्त केला.

जुन्नर हा आमचा तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याबाबतीत सर्वांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पण अजित पवार ज्या पद्धतीने चोरून चोरून बैठका घेतात. प्रचारसभांचा गैरवापर करतात. त्यांना जर महायुती मान्य नसेल तर त्यांनी स्पष्ट तसं सांगावं असे आशा बुचके म्हणाल्या. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 मी शरद पवारांना नेता मानतो पण नाईलाजाने..राजेंद्र शिंगणे देणार अजित पवारांना धक्का?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube