मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमातील ‘बाबू छत्री’ची हत्या; मित्रानेच दारूसाठी केला घात

Jaripatka Police :  नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील नारा वस्ती परिसरात प्रियांशू उर्फ ‘झुंड’ चित्रपटातील छोटा छत्री याची मंगळवारी

Jaripatka Police

Jaripatka Police :  नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील नारा वस्ती परिसरात प्रियांशू उर्फ ‘झुंड’ चित्रपटातील छोटा छत्री याची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशूवर काही अज्ञात इस्मानी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली आहे.

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत प्रियांशु हा मेकोसाबागचा रहिवासी होता आणि ध्रुव साहू नारा येथील रहिवासी होता. दोघांवरही चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या रात्री ध्रुव प्रियांशुला (Dhruv Priyanshu) त्याच्या घरातून घेऊन गेला आणि नारा येथील ओम साई नगरी 2 येथील विनोद सोनकच्या बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ बसला होता. तिथे त्यांनी दारू आणि गांजा प्राशन केला. दारू पिऊन त्यांच्यात काहीतरी वाद झाला. प्रियांशु सुरुवातीला ध्रुवला चाकूने धमकावत होता, त्यानंतर ध्रुव चाकू घेऊन गेला. काही वेळानंतर वाद वाढला आणि रागाच्या भरात ध्रुवने प्रियांशुवर चाकूने वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांशु अर्धनग्न अवस्थेत आढळला, त्याच्या शरीरावर प्लास्टिकची तार गुंडाळलेली होती. रक्ताने माखलेला त्याचा ओरडण्याचा आवाज आणि ओरड ऐकून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने जखमी प्रियांशुला तातडीने मेयो रुग्णालयात नेले, जिथे तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

“दिलबर की आंखों का” थमा मधील दुसरे गाणं प्रदर्शित ; नोरा फतेहीची सोशल मीडियावर धूम 

मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी ध्रुव साहूला ताब्यात घेतले आहे. मृत प्रियांशुवर चोरी, घरफोडी आणि मारहाणीचे 15 गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी ध्रुववरही पाच गुन्हे दाखल आहेत. हत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती अरुण क्षीरसागर पी आई जरीपटका पोलिस स्टेशन, नागपूर यांनी दिली आहे.

follow us