मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये महसूलमंत्री बावनकुळेंची धाड, दुय्यम निबंधक कार्यालयात सापडले पैशांचे बंडल
Chandrashekhar Bawankule यांनी नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झाडाझडती घेतली. यावेळी थेट पैशांचे बंडल सापडल्याची माहिती समोर आली आहे.

Chandrashekhar Bawankule raids on Sub-Registrar’s Office in Nagpur : नागपूरच्या प्रताप नगर भागातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झाडाझडती घेतली. यावेळी थेट पैशांचे बंडल सापडल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्री केली जात असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तिथे दाखल झाले आणि त्यांनी त्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.
Breaking News! विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात! दोन दिवसांपूर्वीच झाला रश्मिका मंदानाशी साखरपुडा
याबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की,नागपूरमध्ये चुकीच्या रजिस्ट्री होत असून चुकीचे दस्त लावले जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत होत्या. त्यानंतर मी या कार्यालयात आलो या ठिकाणी देखील अनियमितता आढळून आली.यावेळी या ठिकाणी असलेल्या ड्रॉवर उघडायला सांगितला असताना तो लॉक होता. तू घडला असता त्यामध्ये पैसे आढळले आहेत.
गुरूवार पेठेतील साई उत्कर्ष प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
नागपूर मध्ये रजिस्ट्री करण्यासाठी पाच हजार,आठ हजार अशाप्रकारे पैशांची मागणी केली जात होती.त्याचबरोबर या अगोदर देखील इन्कम टॅक्सला तीस लाखांच्या वरील रजिस्ट्री झाल्याचं कळवण्यात येत नव्हतं.अशा देखील तक्रारी येत होत्या.अशी माहिती त्यावेळी बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं की,अशाप्रकारे रजिस्ट्रीसाठी जर पैसे मागितले जात असतील.तर त्यांनी थेट माझ्या व्हाट्सअपनंबर वर मला कळवलं तर आम्ही यावर कडक कारवाई करू असं अश्वासन यावेळी त्यांनी केलं. त्यांनी त्यांचा 904944040 हा व्हाट्सअपनंबर देखील यावेळी सांगितला आहे.