गुरूवार पेठेतील साई उत्कर्ष प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

गुरूवार पेठेतील साई उत्कर्ष प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

Pune Bhumipujan

Bhumi Pujan Ceremony of Sai Utkarsh Project :  पुणे – झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात सातत्याने यशस्वीपणे काम करीत असलेल्या सह्याद्री ग्रुप, इनोव्हेशन शेल्टर्स, अजय भोसले व्हेंचर्स व रॉयल प्रमोटर्स आणि बिल्डर्स (Bhumi Pujan Ceremony of Sai Utkarsh Project) यांच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणातंर्गत विकसित होत असलेल्या गुरूवार पेठेतील साई उत्कर्ष या गृहप्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दसऱ्याच्या दिवशी (Pune News)  संपन्न झाला.

माजी ज्येष्ठ पोलिस अधिकारी दत्तात्रय टेमघरे, अशोक अगरवाल, अजय भोसले, सचिन अगरवाल, सचिन टेमघरे, अनिकेत घारमाळकर, रिझवान खान व रोनक बन्सल आदींच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नाईक वस्तीतील रहिवासी रवी गायकवाड, धनंजय वसवे, अमर देसाई, अनिल भांडवलकर, अविनाश सूर्यवंशी, अभिजित नलगे, सिकंदर रंगरेज, सुरेश कठाणे, संदीप सूर्यवंशी, अजय नावगेकर व आनंद भद्रीगे आदींचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

७१६, गुरूवार पेठ येथे असलेल्या नाईक वस्ती मधील कुटुंबांना या प्रकल्पात 300 चौ. फूट (कार्पेट) चे 1 BHK नवीन व हक्काचे घर मिळणार आहे. इथे उभा राहत असलेल्या १४ मजली इमारतीमध्ये पाच लिफ्ट, सोलार सिस्टिम, दोन मजली पार्किंग, मेंटेनन्स साठी दोन कोटी रुपयाचे कॉर्पस फंड, व्यायाम शाळा, लहान मुलांकरिता अंगणवाडी, सांस्कृतिक केंद्र, जनेरेटर, मंदिर आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी, मोहन जोशी, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, किशोर चव्हाण व एसआरए विधी विभाग प्रमुख जनार्दन दहातोंडे. मनोज देशपांडे, सम्राट थोरात, जयंत भावे, अभय मांढरे, विष्णू हरिहर, कमल व्यवहारे, अजय खेडेकर, गणेश घोष, विशाल धनवडे, गफूर पठाण, बाळासाहेब आमराळे, रोहित टिळक, ओंकार कदम आदी उपस्थित होते.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी बांधकाम व्यावसायिक नरेश मित्तल, सुधीर दरोडे, नरेंद्र बालवडकर, मनीष माहेश्वरी, अमित ललवानी, विवेक पाटील, आनंद अगरवाल, रोहित जोशी, सिद्धेश भोसले, राम एरंडे, गिरीश दरोडे, नितीन खैरे, केदार वांजपे, अनिल चित्तोडकर, अखिल होणालीकर, बळीराम गुंड, रमण भेंडे, मोहम्मद शोएब, अजिंक्य यादव, पराग कोतवाल, कपिल अगरवाल, रायचंदानी, संजय सिंह, निलेश तोष्णीवाल, महेश देशपांडे, पारस अगरवाल, अमित जाधव, चेतन वैष्णव, जतीन ठक्कर, ललित साखरे, माऊली दारवटकर, राहुल धावडे, शेखर चिंधे, नवीन कोठारी, शाम कलंत्री, सुनील रांका, सचिन दाते, संजय मेहता, अंकित छाजेड, आदित्य अगरवाल, विशाल उपाध्याय, आशिष खिंवसरा आदी उपस्थित होते.

follow us