Breaking News! विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात! दोन दिवसांपूर्वीच झाला रश्मिका मंदानाशी साखरपुडा
पुट्टपतीहून हैदराबादकडे परतताना विजय देवरकोंडाच्या कारला अपघात झाला.

Vijay Devarakonda Car Accident : दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा अलीकडेच अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत झालेल्या साखरपुड्यामुळे चर्चेत होता. त्याच दरम्यान घडलेल्या एका अपघातामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुट्टपतीहून हैदराबादकडे परतताना विजय देवरकोंडाच्या कारला अपघात झाला. सुदैवाने हा अपघात किरकोळ स्वरूपाचा होता आणि कोणालाही दुखापत झाली नाही.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विजय (Vijay Devarakonda) रविवारी काही जवळच्या मित्रांसोबत पुट्टपती येथे गेला होता. सोमवारी तो हैदराबादला परतत असताना जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील उंडवली परिसरात त्याच्या कारला एका बोलरो वाहनाने जोरदार धडक (Vijay Devarakonda Car Accident) दिली. या अपघातात विजयच्या कारच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले असून, कारचा काही भाग चेपला (Accident) आहे. सुदैवाने कारमध्ये असलेल्या कोणालाही किरकोळ दुखापतही झाली नाही.
दोन दिवसापूर्वी रश्मिकासोबत साखरपुडा
अपघातानंतर विजय देवरकोंडाने आपला प्रवास मित्राच्या गाडीतून सुरू ठेवला. साक्षीदारांच्या मते, त्या वेळी रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. अलीकडेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या (Rashmika Mandanna) साखरपुड्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र, विजय सुरक्षित असल्याची बातमी समजताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
कोण आहे विजय देवरकोंडा?
पूर्ण नाव: विजय साई देवरकोंडा
जन्म: 9 मे 1989
जन्मस्थान: अचंपेट, तेलंगणा
शिक्षण: लिटल फ्लॉवर हायस्कूल, हैदराबाद; वाणिज्य शाखेची पदवी – बड्रुका कॉलेज ऑफ कॉमर्स
अभिनय कारकीर्द
विजय देवरकोंडाने 2011 मध्ये ‘Nuvvila’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याला पहिली ओळख मिळाली ती ‘Yevade Subramanyam’ (2015) या चित्रपटातून. पण त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारं काम म्हणजे 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘अर्जुन रेड्डी’. या चित्रपटातील तीव्र, भावनिक आणि बिनधास्त भूमिकेमुळे विजय रातोरात सुपरस्टार बनला. त्यानंतर त्याने ‘गीता गोविंदम’, ‘डीअर कॉम्रेड’, ‘टॅक्सिवाला’, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ आणि ‘लायगर’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभिनय केला.
🚨 Vijay Deverakonda’s Car in Minor Accident — All Safe
A Lexus carrying Vijay Deverakonda and his family was involved in a small accident near Undavalli in Gadwal district after a Bolero reportedly took a sudden right turn. pic.twitter.com/bTyXyvNYrJ
— Aristotle (@goLoko77) October 6, 2025
पुरस्कार आणि कामगिरी
Filmfare Award (Telugu) – अर्जुन रेड्डी साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता
Forbes India 30 Under 30 (2019) यादीत समावेश
स्वतःची ‘King of the Hill Entertainment’ नावाची प्रॉडक्शन कंपनी स्थापन
विजय देवरकोंडाचे अभिनेत्री रश्मिका मंदानासोबतचे नाते गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. त्यानंतर लगेच झालेल्या या अपघातामुळे थोडा काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र विजय सुरक्षित असल्याने त्याच्या चाहत्यांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे.